पाचोरा तालुक्यातील अतिवृष्टी मुळे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांना अनुदान मंजूर केले होते.पण पाचोरा तहसील कार्यालयातील दोन तलाठी,एक कृषी सहायक आणि दोन कंत्राटी कामगार यांनी ५९८ शेतकऱ्यांना न देता स्वताच्या नातेवाईकांच्या खात्यात २,०७,५०,५९७ रुपये टाकून काढली.चोरली.
ती रक्कम वसूल करून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना द्यावी म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री गुलाबसींग प्रताप पाटील यांनी १५/१/२०२६ पासून सुरू केली होते.
आज १९/१/२०२६ रोजी आमदार, तहसीलदार यांनी बैठक घेऊन पात्र शेतकऱ्यांना देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.त्यावर पुन्हा विश्वास ठेवून गुलाबसींग पाटील यांनी उपोषण सोडले.
यासाठी संदीप महाजन, शिवराम पाटील, सचिन सोमवंशी, राकेश वाघ पाटील यांना सहकार्य केले .