Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


सार्वजनिक सेवे ठिकाणी स्वच्छतागृह आवश्यक - डॉ . सुरेंद्रसिंग पाटील

*जेथे बस थांबा, सरकारी, निमसरकारी कार्यालय, दवाखाने,शाळा,कॉलेजेस तेथे शौचालय स्वच्छतेसाठी आवश्यक.                               डॉ .सुरेंद्रसिंग पाटील                  संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान*                               'सध्या आपल्या संपूर्ण देशामध्ये आपल्या आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत रेल्वे स्टेशन सर्व सरकारी निम सरकारी कार्यालय महानगरपालिका नगरपालिका अंतर्गत सर्व छोटीमोठी शहरे तसेच ग्रामीण भागात :ग्रामपंचायत अंतर्गत  स्वच्छता अभियान राबविण्यात येते तसेच महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री स्वच्छ व सुंदर अभियानांतर्गत सर्व सरकारी निमसरकारी कार्यालय तसेच शाळा कॉलेजेस ऑफिसेस ग्रामपंचायत अशा विविध स्तरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे सद्यस्थितीत वातावरणात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे अनेक जणांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विविध प्रकारच्या गोळ्यांमुळे लघवी थांबू शकत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात जोरात लघवी लागण्याचं  प्रमाण वाढत आहे त्यात महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान बसची वाट बघता बघता बराच वेळ लागतो म्हणून *जेथे महामंडळ , महानगरपालिका  नगरपालिका बस थांबा तेथे कॅमेरा सहित पुरुष व महिलांसाठी शौचालय* ही योजना प्रवाशांसाठी अत्यावश्यक बाब आहे तसेच सरकारी, निमसरकारी, महामंडळ , महानगरपालिका, नगरपालिका ऑफिसेस , दवाखाने,शाळा, कॉलेज या सर्व ठिकाणी पुरुष व महिलांसाठी रस्त्याच्या बाजूने बाहेरून जाता येईल अशा ठिकाणी कॅमेरा सहित शौचालय  अन्यथा शौचालय जेथे असेल तेथील मार्ग स्पष्ट स्वरूपात गेट जवळ दर्शवण्यात यावा. जेणेकरून ज्यांना बाथरूमचा त्रास आहे त्यांची समस्या कमी होईल. उघड्यावर बाथरूम करण्याचे प्रमाण कमी होईल, डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.