Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


इतिहास व संस्कृतिचा अनुभव देणारी थोरगव्हाण हायस्कूल ची सहल संपन्न

इतिहास, संस्कृती आणि अध्यात्माचा अनुभव देणारी देशमुख हायस्कूलची सहल यशस्वी

थोरगव्हाण प्रतिनिधी :
इतिहासाची साक्ष देणारे किल्ले, अध्यात्मिक ऊर्जा देणारी मंदिरे आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकवण देणारी स्थळे पाहण्याची संधी मिळावी, या उद्देशाने डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण (ता. रावेर) येथील विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. ही सहल अत्यंत यशस्वी, शिस्तबद्ध व उत्साहात पार पडली.
डी. एस. देशमुख हायस्कूल, थोरगव्हाण (ता. रावेर) येथील विद्यार्थ्यांची दोन दिवसीय शैक्षणिक सहल दिनांक २१ व २२ जानेवारी रोजी शिक्षण विभाग व संस्थेच्या परवानगीने उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. संस्थेचे संचालक नंदकुमार एकनाथ चौधरी व रविंद्र काशिनाथ चौधरी यांच्या शुभहस्ते राज्य परिवहन मंडळाच्या बस चालकांचा शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यासह पालक संघाचे चंद्रकांत कोल्हे व विजय चौधरी यांनी सहलीस शुभेच्छा दिल्या.
सहलीचे मार्गदर्शन शाळेचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले व ते सहलीत प्रत्यक्ष दोन दिवस उपस्थित होते. सहल समितीचे प्रमुख एम. के. पाटील होते. समिती सदस्य म्हणून वाय. जे. कुरकुरे, के. पी. चौधरी, जे. ए. चौधरी, एस. बी. सपकाळे तसेच सौ. जयश्री प्रविण चौधरी व सौ. नयना ज्ञानेश्वर पाटील यांनी मुलींची जबाबदारी व शिस्त सांभाळली. सर्व समितीचे सहकार्य लाभले.
आयोजन करताना सहल समितीने प्रथम इच्छुक विद्यार्थ्यांची बैठक घेतली व मार्गाची माहिती दिली. पालक सभेत सहलीचा मार्ग निश्चित करण्यात आला. शालेय समितीच्या बैठकीत चर्चा करून सर्व नियमांची काटेकोर पूर्तता करत दोन दिवसांची शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या सहलीत एकूण ३९ विद्यार्थी व ३५ विद्यार्थिनी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी खुलदाबाद येथील भद्रा मारुती, घृष्णेश्वर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जगप्रसिद्ध मंदिर, वेरूळ येथील कैलास मंदिर तसेच ऐतिहासिक देवगिरी (दौलताबाद) किल्ला यांसारख्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या.
तसेच पैठण येथील म्युझिकल फाउंटन शो व संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधीचे दर्शन घेतले. शिर्डी येथे ‘वेट अँड जॉय’ वॉटर पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला व साईबाबांचे दर्शन घेतले. विद्यार्थीनी साठी स्पेशल एक व विद्यार्थ्या साठी एक अशा दोन बसेस मधे आठ गटात विद्यार्थी विभागले होते प्रत्येक गटात गटप्रमुख नेमण्यात आले कु .प्राची चौधरी , कु . काळे डिंपल , कु . तायडे देवीका , कु . भोलाणे भावना , कोळी धीरज  चंद्रकांत , झोपे मोहित  निलेश , तायडे कुणाल ,कोळी धीरज सोपान व प्रत्येक गटाला महाराष्ट्रातील शिवनेरी , रायगड , पन्हाळा , देवगिरी ,सिंधुदुर्ग , जंजिरा , सिंहगड , लोहगड अशा किल्यांचे अभिमानाने संबोधन नाव देण्यात आले होते . 
संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, सहसचिव रामराव देशमुख तसेच सर्व संचालक मंडळ यांनी या शैक्षणिक सहल उपक्रमाचे अभिनंदन केले.
विजय गंगाधर चौधरी (मूळ गाव थोरगव्हाण, ह.मु. वेरूळ – प्रसाद, पूजा साहित्य व लॉजिंग व्यवसाय) यांची ओळख भेट झाल्यानंतर त्यांनी सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांचे प्रेमभावाने स्वागत केले व आपल्या घरी आपुलकीने भेट दिली. यामुळे एक सामाजिक ऋणानुबंध अधिक दृढ झाला. त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
सर्व विद्यार्थी व शिक्षकवृंद सुखरूप शाळेत परतले. ही सहल विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय उपयुक्त ठरली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.