शिंदी येथे दि. 25 जानेवारी रोजी बुद्धरूप स्थापना कार्यक्रमाचे आयोजन : उपस्थितीचे आवाहन.....
शिंदी, ता.भुसावळ----- येथे 25 जानेवारी 2026 रविवार रोजी बुद्धरूप स्थापना कार्यक्रमाचे आयोजन नागसेन बुद्धविहार शिंदी येथे करण्यात आले आहे.
तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार आजही जिवंत असून समाजाला योग्य दिशा दाखवणारे दीपस्तंभ आहेत. समाजात धम्म भावना अधिक दृढ होणे आवश्यक आहे. शांती, करुणा, समता हे विचार समाजात प्रभावीपणे पोहोचवणे आवश्यक आहे .यासाठी शिंदी येथील धम्म उपासक- उपासिका व धम्म सामाजिक कार्यकर्ते यांच्या कल्पनेतून बुद्धरूप स्थापना कार्यक्रम नागसेन बुद्ध विहार शिंदी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
जामनेर येथील पूज्जनीय भन्ते धम्मदीप यांच्या उपस्थितीत दिनांक 25 जानेवारी रोजी शिंदी येथे सकाळी 9 वाजता नवीन प्लॉट पासून नागसेन बुद्ध विहार पर्यंत बुद्धरूप मिरवणूक, नागसेन बुद्ध विहारात 10 वाजता बुद्धरूप स्थापना, 10:30 ते11 सावित्री माई फुले वाचनालय आणि अभ्यासिका उद्घाटन,धम्मदेसना आभार, 11 ते 12 पर्यंत भिक्खूसंघ भोजनदान व स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास परिसरातील उपासक- उपासिका व जनतेने उपस्थिती देण्याचे आवाहन सिद्धार्थ भीमराव तायडे (मा. उपसरपंच) संदीप आनंदा सपकाळे (सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच पती), दिव्य प्रकाश बहुउद्देशीय संस्था,समस्त ग्रामस्थ शिंदी ता. भुसावळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.