Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


तिळगुळ घ्या गोड गोड बोला व झाडे लावुन पर्यावरण रक्षण कर - डॉ . सुरेंद्र सिंग पाटील यांचा संदेश

*मकर संक्रांतनिमित्त निसर्गनिर्मित संपत्तीचे नुकसान करणार नसल्याचे तसेच  भूमातेवर तिळगुळ स्वरूपात सजीवसृष्टीस आवश्यक वृक्ष संगोपनसहित लावण्याचा संकल्प करावा डॉ.सुरेंद्रसिंग पाटील*                         14जानेवारी 2026  मकर संक्रांत त्यानिमित्ताने आपण सर्वजण काही कारणास्तव नाराज झालेले तसेच नाराज अनसलेली  मित्रमंडळी नातेवाईक तिळगुळ एकमेकांना देऊन तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणत एकमेकांना देत असतो . सद्यस्थितीत एकमेकात चुरस निर्माण करत मित्रमंडळी नातेवाईक आपसात भांडत असतात तसेच कामानुसार पुन्हा एकत्र होतात.    आज रोजी आपणा सगळ्यांना निरोगी व सुरक्षित आयुष्य हवे आहे. सद्यस्थितीत झपाट्याने झाडांची संख्या कमी होत जमिनीची धूप  मोठ्या प्रमाणात होऊन निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने पर्यावरणावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होऊन आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणात बदल होऊन आपले व आपल्याबरोबर निसर्गनिर्मित सर्व सजीवांना आवश्यक असलेले झाडे तोडण्यात आली. तसेच जंगलातीलही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने जंगली प्राणी गावात येऊ लागले. जंगलातील साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात घट झाली पक्षांचा अधिवास कमी झाला जंगलातील आयुर्वेद औषधे मिळेनासे झाले पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असणारे निसर्गनिर्मित साधनांची बऱ्याच प्रकारे हानी झाल्याने निसर्गदेवता कोपला तर कोणाचंही ऐकत नाही काय होते याचा अनुभव आपणास मिळालेला आहे कधी न होणारा ढगफुटी सदृश्य पाऊस यंदा महाराष्ट्रातच बहुसंख्य जिल्ह्यांमध्ये बरसला शेतीचे शेत वाहून गेले मनुष्य जीवन वाचवण्यासाठी स्वतः धडपडत असल्याने अनेक  प्राणी वाहून गेले  शेतातील माती वाहून जमिनीचा पोत बदलला शेती निजूर झाल्या जातेअसुरक्षित असल्याने निरोगी व सुरक्षित जीवनासाठी कुठलाही भेदभाव न करणाऱ्या आपणा सर्वांना निरोगी व सुरक्षित जीवनासाठी आवश्यक संक्रांतीच्या निमित्ताने भूमातेची माफी मागत तिळगुळ अर्पण करून पर्यावरणास योग्य विविध प्रकारची ऑक्सिजन युक्त तसेच फळाफुलांची झाडे लावण्याचा संकल्प करा सद्यस्थितीत संपूर्ण भारतात दूषित हवेच प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेले असून मानवास अनेक आजारांचा सामना करावा लागत आहे जीवन कठीण झाले आहे पर्यटनावर याचा मोठा परिणाम झालेला आहे वेळीच आपण सावध होण्याची गरज आहे वातावरण प्रदूषण मुक्त राहण्यासाठी ज्यापासून प्रदूषण निर्माण करणारे अग्नी ,जल, वायू, ध्वनी, प्लास्टिक या सर्व गोष्टी टाळण्याचा संकल्प करावा तसेच आपल्या येथे सद्यस्थितीत जे झाडांचे रोपे गुरेढोरं बकऱ्या खाऊन जातात त्यामुळे गुरेढोरे जे झाड खात नाहीत अशा झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजीअशुद्ध होण्याचा प्रमाण वाढत आहे हवा शुद्ध राहण्यासाठी विविध वड पिंपळ नीम कदम औदुंबर अशा विविध प्रकारच्या ऑक्सिजन युक्त  वृक्ष लावून  संगोपन करण्याचा संकल्प करून आपणास निरोगी आयुष्य देणारा आपला खरा मित्र जपूया.  डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान .                    ,      तसेच महिला वर्ग मकर संक्रांतीच्या दिवसापासून काही दिवस हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करून गृहपयोगी वस्तू भेट स्वरूपात देतात. तरी या वेळेस निसर्गास आवश्यक असणाऱ्या झाडांची रोपे भेट स्वरूपात द्यावे त्याचबरोबर विविध प्रकारच्या बियां चे वाटप करावे ते बीजारोपण आपापल्या घरी कुंडीमध्ये अथवा तेलाची दुधाची खाली पिशवीत  पावसाळा लागेपर्यंत वाढवावे व जसा पाऊस चालू होईल तसे त्याचे आपल्याकडील  बीजारोपण द्वारे वाढलेली रोपे भूमातेवर लावावी व त्यांचे संगोपन करावे. पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे संचालक श्री सुरेंद्रसिंग पाटील                          आपले आदरणीय प्रधानमंत्री जी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियानाबरोबर आदरणीय प्रधानमंत्रीजी यांच्या संकल्पनेनुसार एक पेड मॉ के नाम संगोपन सहित वृक्षारोपण, बिजारोपण करून आपले व आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य निरोगी व सुरक्षित राहण्यासाठी हातभार लावावे .           रोपांबरोबर           बिजारोपणद्वारे आपल्या पसंतीचे पर्यावरणास मदत करणारे स्वनिर्मित झाडे लावू, झाडे जगवू प्रदूषण मुक्त भारत घडवू या .   डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.