विविध शालेय कार्यक्रमांचे बक्षीस व प्रमाणपत्र वितरण**
थोरगव्हाण (ता. रावेर) | दि. १२ जानेवारी
दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) संचालित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंद जयंती वाङ्मय मंडळ समितीच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध शालेय उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाङ्मय मंडळ समिती प्रमुख तथा कलाशिक्षक श्री. एस. बी. सपकाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व शालेय समितीचे सदस्य श्री. नंदकुमार एकनाथराव चौधरी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चंद्रकांत सुराजी पाटील (संचालक) उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. नंदकुमार चौधरी यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची आजच्या काळात अत्यंत गरज असल्याचे सांगून, विद्यार्थ्यांनी त्यांचे आदर्श व गुण आत्मसात करून जीवनात यशस्वी वाटचाल करावी, असे मार्गदर्शन केले. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. सांस्कृतिक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून सौ. जयश्री चौधरी, उपप्रमुख श्री. मिलिंद पाटील तसेच सर्व समिती सदस्यांनी योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी केला.
याचप्रसंगी एलिमेंट्री व इंटरमिजिएट परीक्षांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी कलाशिक्षक श्री. एस. बी. सपकाळे यांनी नियोजन, सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच महात्मा गांधी विचार परीक्षा अंतर्गत विद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यक्ष श्री. नंदकुमार चौधरी व प्रमुख पाहुणे श्री. चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रे व पदके प्रदान करण्यात आली. ही परीक्षा हिंदी भाषा प्रचार समितीचे श्री. के. एम. पाटील व श्री. जे. ए. चौधरी यांनी आयोजित केली होती.
यावेळी संस्थेचे संचालक श्री. चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत विद्यालयातील विविध उपक्रमांचे कौतुक केले व अशा उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी के पाटील यांनी हे सर्व उपक्रम विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात नियोजनबध्द राबवले व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे . कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक श्री. वाय. जे. कुरकुरे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या अलौकिक जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती विद्यार्थ्यांना दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. बी. सपकाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. जयश्री चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास सौ. जयश्री प्रविण चौधरी, श्री. के. पी. चौधरी, श्री. एम. के. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक-बंधु भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.