Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मलकापूर येथे दिव्यांगांसाठी आजीवन मोफत उपचार . डॉक्टर अमोल फिरके यांचा उपक्रम

*स्वामी विवेकानंद जयंती चे औचित्य साधून डॉ. अमोल फिरके यांच्याकडून दिव्यांग बांधवांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच दिव्यांग रुग्णांना आजीवन आयुष्यभर मोफत उपचार*
मलकापुर:- आरोग्यदीप हाॅस्पिटल चे संचालक डॉ. अमोल फिरके यांच्या  आरोग्यदीप हॉस्पिटलमध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्त अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या राज्य सचिव कलीम शेख यांच्या पुढाकाराने आज दि.11 जानेवारी 26 रविवार रोजी मलकापुर शहरातील बहु दिव्यांग ,व गोरगरीब, रुग्णांची आरोग्य तपासणी,सीबीसी,बि.पी, हिमोग्लोबिन, शुगर,ईसीजी आदिंची मोफत वैद्यकीय तपासणी व या रुग्णांना आजीवन आयुष्यभर मोफत उपचार केले जाणार असल्याचे डॉ.अमोल फिरके यांनी सांगितले.
       रविवार रोजी आयोजित या शिबिरात अपंग जनता दल स़घटनेचे राज्य सचिव  कलीम शेख, शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, ज्येष्ठ पत्रकार हरीभाऊ गोसावी,हिदायत जमादार, संदीप भोंबे,सोनु जवळकार, सत्तार शाह, गणेश पोलाखरे,यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात शुभांगी एकनाथ डवले, विजय रमेश भोंबे, शेख एजाज, अजय सोनाजी कासे, शेख आसिफ, शेख एजाज शेख अयुब,सै.आसिफ,संध्या प्रभाकर पहाडे, सिंदू जवळकार, शेख वसीम,अर्जुन चोपडे, उमेश टाकसाळे,मो.रफिकभाई, शेख सलीम,मो.सोफीयान,मो.अयान सह आदी वायवृद्ध  व दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली या सर्व दिव्यांग बांधवांना डॉ.अमोल फिरके यांचे तर्फे मोफत औषधी देण्यात आली. यावेळी डॉ अमोल फिरके यांची टीम राहुल बोरसे, यश भोळे ,जीवन इंगळे ,संगीता मालठाणे,ओम काॅम्पयुटराईज क्लिनिक लेबाॅटरीरचे संचालक संदीप लंबोधरी यांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.