निधन वार्ता
रवींद्र वसंत उपासनी
*चाळीसगाव येथील रहिवासी व पुणे स्थित*
*कै. श्री रविंद्र वसंत उपासनी उर्फ रविदादा*
*(श्रीकृष्ण टायपिंग सेंटरचे चालक व मालक)*
*यांचे आज दिनांक १० जानेवारी २०२६, दुपारी १२:१५ वाजता, पुणे येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.*
*प्रेम, त्याग, संयम व संस्कार यांचा जिवंत आदर्श असलेले रविदादा*
*हे केवळ कुटुंबाचेच नव्हे तर समाजाचेही आधारस्तंभ होते.*
*.*
*शिक्षण व प्रामाणिक श्रमातून उभे केलेले*
“*श्रीकृष्ण टायपिंग सेंटर”*
*हे त्यांच्या कष्ट, सचोटी व सेवाभावी वृत्तीचे प्रतीक होते.*
*अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवताना*
*ते स्वतः मात्र सदैव नम्र व नि:स्वार्थ राहिले.*
*त्यांच्या जाण्याने उपासनी व जोशी परिवारावर,*
*नातेवाईक, मित्रमंडळी व हितचिंतकांवर*
*दुःखाचा डोंगर कोसळला आहे.*
*त्यांचा शारीरिक सहवास जरी हरपला असला,*
*तरी त्यांनी दिलेले संस्कार, प्रेम व आठवणी*
*आमच्या हृदयात सदैव जिवंत राहतील*. हीच दिव्य महाराष्ट्र न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
🔹 *अंत्यविधी*: बालेवाडी स्मशानभूमी, पुणे
१० जानेवारी रात्री ८:००