वरणगाव :- शहरात होणारे विविध विकस कामे भारतीय जनता पक्षाचे तालुक्याचे आमदार व रावेर लोकसभा मतदारसंघच्या खासदार यांनी शहराच्या विविध विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याच कामे झाली आहेत त्यामुळे मि केले असे म्हणु नये दोन्ही नेते मोठ्या मनाचे असल्यानेच नगर परिषदेत नगर सेवकांची संख्या वाढली आहे यापुढेही भारतीय जनता पार्टी चौफेर विकास करण्यासाठी कटीबंध असल्याचे मत शहराध्यक्ष पदी निवड झालेले सचिन माळी यांनी बैठकीत व्यक्त केले आहे
भारतीय जनता पार्टीची नुकत्याच झालेल्या एका पक्ष बैठकीत शहरातील विविध पदावर नियुक्त्या करण्यात आल्या त्यात शहराची जाबदारी सचिन निवृत्ती माळी यांच्यावर सोपविण्यात आली आहे त्यावेळी त्यांनी बैठकीत शहराचा चौफेर विकास करण्यासाठी मंत्री गिरिष महाजन , केंद्रीय मंत्री रक्षा खडसे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांनीच आज पर्यंत निधि दिल्यानेच शहरात विविध प्रकारचे विकास कामे केली गेली आहे कोणी वैयक्तीक स्वार्थपोटी माझ्यामुळेच शहरात विकासाचे काम झाली असे सांगून जनतेची दिशाभूल करण्याचे थांबवावे व मानाचा मोठेपणा दाखवत शहराचा विकास भाजपा सरकारनेच केल्याचे मोठ्या मनाने सांगुन स्वतःची स्तुती थांबवावी एकी कडे मी पक्ष सोडला नाही पक्षाने माझ्यावर अन्याय केला पक्षाच्या त्या बद्दल चुकीची माहिती देऊन छोट्या मनाचे असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना वेळीच प्रतिउत्तर दिले जाईल असे भाजपा शहरध्यक्षपदी निवड करण्यात आलेले सचिन माळी यांनी आपले मत व्यक्त करीत मोठ्याचे मार्गदर्शन व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी तळागळा पर्यंत पोहचविण्याचे काम करणार असल्याचे सांगितले