Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नविन वर्षात पर्यावरण रक्षणाचा संकल्प करा . - डॉ सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

*नैसर्गिक आपत्ती, विविध आजार याचे मूळ निसर्गनिर्मित सजीवांना आवश्यक साधन संपत्तीची हानी.     डॉ सुरेंद्रसिंग पाटील                  येणाऱ्या नवीन वर्षात प्रत्येकाने पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक गोष्टीं करण्याचा संकल्प करणे अत्यंत आवश्यक. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*.                        31 डिसेंबर हा 2025 चा शेवटचा दिवस या 2025 मध्ये आपणास अनेक आपत्तींना सामोरे जावे लागले जणू काही पृथ्वीचे अस्तित्व राहण्यासाठी नैसर्गिक आपत्ती, निरोगी आयुष्य राहण्यासाठी आपणास 2025 मध्ये निसर्गाने नैसर्गिक आपत्ती द्वारे एक प्रकारे सूचना  देत सावध केलेले आहे. निसर्गास कोणीही रोखू शकत नाही. निसर्ग कोपला म्हणजे काय होऊ शकते हे आपणास 2025 मध्ये समजले आहे. आपल्याकडील सर्व भागात कधीही न होणारा  ढगफुटी सदृश्य पाऊस यामुळे सर्व दूर अनेक शेत वाहून गेले जमिनीचा पोत जाऊन जमीन निजूर झाल्या. अनेक गावांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मानवाला आपला जीव वाचवणा जरुरी असल्यामुळे अनेक गाई म्हशी शेळ्या मेंढ्या कोंबड्या सर्व वाहून गेल. अतोनात न भरून येणारी हानी झाली. तसेच वातावरण बदलामुळे अनेक जण विविध आजाराद्वारे मृत झाले आज रोजी अनेक जणांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झालेले आहे त्यामध्ये शालेय मुला-मुलींमध्ये हे प्रमाण खूप आहे. तसेच डायबिटीसचेही प्रमाण लहान मुलांमध्ये सुद्धा आढळत आहे. अनेक जणांच्या किडन्या खराब झालेले आहेत. त्यामुळे डायलिसिस बहुसंख्य लोकांना करावे लागत आहे. डायलिसिस करूनही बरेचसे जन कंटाळून घाबरून मूर्त पावत आहे. तसेच कॅन्सरचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे अनेक जणांना कॅन्सरची लागण झालेली आहे पूर्वी एखादा दुसऱ्याना कॅन्सर होत असे. अनेक जणांना एन्जोप्लास्ट बायपास यांचे ऑपरेशन करावे लागत आहे. या सर्व व इतरही आजारांचं मूळ निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे नुकसान झाल्याने आपल्या येथे सर्वदूर दूषित हवा मोठ्या प्रमाणात वाढली आहे  त्याच्या बरोबरीला रासायनिक शेती केमिकलयुक्त खाद्य म्हणून प्रत्येकाने आपल्यासाठी व निसर्गनिर्मित सर्व सजीवांसाठी विविध प्रकारचे ऑक्सिजन युक्त तसेच वर्षानुवर्ष टिकणारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच ओपन स्पेस , शाळा, दवाखाने, विविध ऑफिसमध्ये शेताच्या बांधावर तसेच विविध फळांची ,फुलांची झाडे शेतांमध्ये आपल्या घरातील अंगणात संगोपनासहित वृक्ष लागवड करण्याचा तसेच रासायनिक शेती ऐवजी हळूहळू सेंद्रिय शेती करण्याचा ती होण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे तसेच आपला परिसर व आपण शिकत असलेल्या ठिकाणी या ड्युटीवर जातो त्या ठिकाणी स्वच्छता ठेवण्याची सवय लावण्याचा. पाण्याचा वापर योग्यरित्या करण्याचा तसेच पेट्रोल डिझेल मुळे सुद्धा हवेतील वातावरण बिघडते त्यामुळे शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचा सिंगल युज प्लास्टिकचा वापर न करण्याचा कर्कश आवाज असलेला ध्वनी टाळण्याचा तसेच अशुद्ध हवेचे रूपांतर शुद्ध हवेमध्ये होण्यासाठी तसेच पृथ्वीचे अस्तित्व राहण्यासाठी  पर्यावरण संतुलनासाठी ज्या ही गोष्टी लागत असतील त्यांचा प्रत्येकाने संकल्प येणाऱ्या नवीन वर्षात १ जानेवारी  2026 पासून करणे अत्यंत गरजेचे आहे . डॉ. सुरेंद्रसिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.