Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जमीन संपादन केल्यावर त्यावर वृक्ष लागवड करावी व पर्यावरणाचे रक्षण कराव _ डॉक्टर सुरेंद्र सिंग पाटील यांचे आवाहन

*कुठल्याही कार्यासाठी जमिनीचे भूसंपादन प्रक्रिया झाल्याबरोबर लगेच तेथे संगोपनासहित वृक्षारोपण करणे जरुरीचे           डॉ.सुरेंद्रसिंग पाटील*.
                   
  कुठलेही सरकारी कामे व प्रकल्प  करण्यासाठी जमिनीचे भूसंपादन करणे महत्त्वाचे आहे. भूसंपादन प्रक्रियेस बराचसा कालावधी लागत असतो. त्यामुळे ज्या कामासाठी जमीन हस्तांतरण करत असतो त्या कामाला बराचसा कालावधी लागतो. काम करण्यासाठी त्या कामांमध्ये येणाऱ्या मोठमोठ्या झाडांची मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करावी लागते. झाडे नसल्यामुळे विविध प्रकारच्या पक्षांचा अधिवास नष्ट होतो तेथील तापमान वाढत पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो.  सर्व दूर भकास वातावरण निर्माण होते आपणास काम सुरू करण्याच्या पहिले जे झाडे नष्ट होणार असते ते असतानाच आपणास अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे तर झाडे कमी झाल्यावर अजून मोठ्या प्रमाणात संकटांचा सामना करावा लागतो त्यामुळे जसजसे जमिनीचे भूसंपादन होत राहील तेथे संगोपणासहित विविध प्रकारचे वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे झाडे स्थानिक शेतकऱ्यांची चर्चा करून त्यांच्यामार्फत अथवा ज्या कार्यासाठी आपण जमीन भूसंपादित करीत असतो त्या डिपार्टमेंटने संगोपनासहित विविध प्रकारचे झाडे लगेच लावणे बंधनकारक केल्यास काम पूर्ण होईपर्यंत झाडे मोठी मोठी होऊन आपणास जो वृक्षतोडीचा फटका बसत आहे तो बऱ्याचशा प्रमाणात कमी होईल. असे मत डॉ. सुरेंद्रसिंग पाटील  संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान. यांनी व्यक्त केले आहे . 
प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्ष तोड वपर्यावरणाची हानी यावर हा उत्तम उपाय आहे खरोखर सरकारने किंवा संबंधित खात्याने जर हा उपाय अंमलात आणला तर पर्यावरणासाठी मदत होईल .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.