Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महामानवांचा महापरिनिर्वाण दिन बोधी व इतर वृक्ष लावुन साजरा करा - डॉ सुरेंद्रसिंग पाटील

*०६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिवस त्यानिमित्ताने संकल्प करूया बोधी वृक्षाबरोबर इतरही वृक्ष लावण्याचा .     डॉ . सुरेंद्रसिंग पाटील

                     ०६ डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार समाजसुधारक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी यालाच महापरिनिर्वाण हा शब्द बौद्ध परंपरेनुसार घेतलेला आहे महापरिनिर्वाण म्हणजे निर्वाण किंवा अंतिम मुक्ती प्राप्त करणे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर असंख्य जनसमुदायसमोर हिंदू धर्म ऐवजी बौद्ध धम्म स्वीकारला कारण जोपर्यंत जाती आधारित धर्म आहे तोपर्यंत समानता येणार नाही बाबासाहेबांचे दैवत बौद्ध धर्म त्यातील प्रज्ञा करुणा व समता तसेच विद्या विनय आणि शील हे होते बाबासाहेबांचे प्रथम गुरु गौतम बुद्ध त्यांना विश्वास होता की जगाचे कल्याण फक्त बौद्ध धर्म करू शकेल नंतर त्यांचे दुसरे गुरु कबीर त्यांचे वडील कबीरपंथी असल्यामुळे त्यांच्यावर कबीरांच्या तत्वाचा फार मोठा परिणाम झाला तिचे गुरु महात्मा फुले यांनी सर्व अल्प समाजाला शिक्षणासाठी प्रेरणा दिली भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म क्षत्रिय परिवारात नेपाळमधील लुंबिनी येथे झाला त्यांचे वडील शक्य गणराज्याचे राजा होते गौतम बुद्धांचे नाव सिद्धार्थ होते गौतम बुद्ध हे तत्त्वज्ञ समाज सुधारक आणि बौद्ध धर्माचे संस्थापक होते त्यांनी काही काळानंतर पत्नी व मुलाचा त्याग केला त्यांचे गोत्र गौतम असल्यामुळे त्यांना गौतम म्हणून ओळखत बोधी वृक्ष हे बोधगया मधील महाबोधी मंदिराच्या परिसरात एक पिंपळाच झाड आहे या झाडाखाली भगवान गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त होण्यासाठी सहा वर्ष तपस्या केली बोधी म्हणजे ज्ञान वृक्ष म्हणजे झाड म्हणजे ज्ञानप्राप्तीचे झाड पिंपळाचे झाड हे बौद्ध धर्माचं अत्यंत पवित्र प्रतीक आहे बोधी वृक्षाचे पाने हृदयाच्या आकारासारखे असते त्यामुळे बोधी वृक्ष वाढण्याबरोबर आत्मज्ञान सुद्धा वाढत असते भारतीय राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे जी प्रत्येक भारतीयाला समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय देते आज आपण बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे शांतपणे झोपतो आहे या थोर महापुरुषांची जयंती पुण्यतिथी पुतळ्यांना हार घालून साजरी करतो बाबासाहेब नेहमी सांगत मी तुम्हाला स्वातंत्र्य समता आणि बंधुता देऊ शकतो पण तिथे कोणीही जबाबदारी तुमची आहे म्हणून महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्ताने प्रतिज्ञा करूया की आपण जाती जातीत भेदभाव निर्माण करणार नाही डॉक्टर सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व सुद्धा आहे हिंदू संस्कृतीत मुंजोबाचे झाड म्हणून पूजा अर्चा केली जाते पितृपक्षात आपण कावळ्यांची येण्याची वाट पाहत असतो कावळ्यांच वास्तव्य हे पिंपळाच्या झाडावर असते रहिवासी भागात पिंपळाच्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे तसेच पिंपळाचे झाड ज्ञानप्राप्तीसाठी तसेच मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची निर्मिती करणारे आहेत कावळे  पिंपळाच्या झाडावर आपले घरटे बांधत असतात कावळ्यांना येणारा पावसाळा कसा येईल त्याचा अंदाज आलेला असतो व त्यानुसार आपले घरटे बांधत असतात असे हे पिंपळाचे झाड सर्वदृष्ट्या महत्त्वाचे आहे तरी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी कोणाला त्रास नाही होईल या पद्धतीने शक्यतो शाळा कॉलेज ओपन स्पेस तसेच त्या समोरील रस्त्यांवर या सर्वात जास्त आवश्यक असलेली ऑक्सिजन युक्त व विविध कार्यासाठी झाडाची संगोपन सहित झाडे लावावी . डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण सागर प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.