Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शिंदी शिवारात बिबट्या दिसल्याने शेतकरी भयभीत . बंदोबस्त करण्याची समाज सेविका निलीमा नेमाडे यांची मागणी

शिंदी शेती शिवारात बिबट्याचे दर्शन
शेतकऱ्यांसह मजुरांची धावपळ

भुसावळ तालुक्यातील  शिंदी येथील शेती शिवाराच्या रानपट्टी भागात शुक्रवार रोजी सकाळी साडे आठ ते नऊ ते वाजेचे दरम्यान बिबट्याच्या दर्शनाने व त्याच्या डरकाळ्यांनी शेतकरी शेतमजुरांची धावपळ उडाली असे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले. वन खात्याने बिबट्या चा बंदोबस्त करण्याची मागणी समाज सेविका निलीमा नेमाडे यांनी केली आहे .
सध्या रब्बी हंगामाचा काळ सुरु  असून सकाळी  ललित राजपूत , दिलीप सुभाष पाटील, अनिल शामराव पाटील या रानपट्टी भागात गावाला लागून असलेल्या  शेतकऱ्यांच्या शेती शिवारात  बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज आला. कपाशीच्या शेतातील तुरीच्या पिका जवळून जात असल्याचे दिसत  दुरूनच  दर्शन झाल्याने पिकांना पाणी भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली.
शेतकऱ्यांची व मजुरांची आरडा- ओरड सुरू झाली. महिला मजूर वर्गाची मोठी धावपळ उडाली व कसे तरी गावाकडे धावत निघाले होते असे दिलीप पाटील या शेतकऱ्याने सांगितले. जेवणाचे डबे तसेच सोडून शेतकरी मजूर वर्ग घराकडे निघून आला. एक-दोन जण स्वसंरक्षणासाठी झाडावर चढले होते. बिबट्याच्या धास्तीने दिवसभर शेतकरी शेतमजूर शेती शिवाराकडे फिरकला नाही .
शिंदी गावाच्या शेती शिवाराला लागून मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र असल्याने रानपट्टी, नागमई, लोणवडी, खोरे तलाव भाग परिसरात वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असल्याचे वेळोवेळी दिसून येते.
शिंदी शेती शिवारात गेल्या काही  वर्षापासून आदिवासी पावरा जमातीचे लोक शेती कसण्यासाठी राहत आहेत.त्यामुळे त्यांच्यामध्येही भीतीचे वातावरण दिसून येते. जीविताच्या संरक्षणाच्या दृष्टीने परिसरातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची गरज निर्माण झाली असून एखादी अघटीत घटना घडण्याअगोदर वनविभागाने वेळीच बिबट्यांसह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज असल्याचे शेतकरी शेतमजूर वर्गात बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.