Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दिप नगर येथील शारदा विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात गरजूंना केले ब्लँकेट वाटप

शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर माजी विद्यार्थी यांनी  बालदिन व वीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप केले .
 शारदा माध्यमिक विद्यालय, दिपनगर ता. भुसावळ, जि. जळगाव येथील सन 2000–2001 बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडले. दीर्घकाळानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणी जागवत मैत्रीचा सुंदर क्षण साजरा केला.

या स्नेहसंमेलनात प्रवीण पाटील, रमाकांत चौधरी, अरुण पाटील, सचिन बोरोले, भूमिका चौधरी, नयना पाटील, दीपाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. NDNGSA असोसिएशन वरणगाव यांचे सहकार्य लाभले. तसेच रुपेश बऱ्हाटे, रुपेश बाऊस्कर, राहुल दाते, V. M. घोडके यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

बालदिन व वीर बिरसा मुंडा जयंती निमित्त — गरजू बालकांना ब्लँकेट वाटप

स्नेहसंमेलनातून उरलेल्या निधीचा उपयोग बालदिन (14 नोव्हेंबर) आणि शहीद वीर बिरसा मुंडा जयंती (15 नोव्हेंबर) या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमासाठी करण्यात आला.

या निधीतून हातनुरधरण परिसरातील मासेमारी विस्थापित वस्तीतील गरीब, कष्टकरी आणि अल्पउत्पन्न कुटुंबातील बालकांना थंडीपासून संरक्षणासाठी गरम ब्लॅंकेट मोफत वाटप करण्यात आले.

थंडीच्या काळात या गरजू परिवारांना उब मिळावी, तसेच बालदिनाच्या दिवशी मुलांच्या मदतीचा हात पुढे करण्याचा हेतू या उपक्रमातून साधला गेला.

स्थानिक ग्रामस्थांनी माजी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक पुढाकाराचे कौतुक केले. स्नेहसंमेलनाच्या आनंदासोबत समाजासाठी काहीतरी करण्याची भावना जपणारा हा उपक्रम विशेष ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.