महाराष्ट्र जागृत जनमंच ने शेत रस्ता आणि शेत मोजणी अभियान राबवले होते.त्यासाठी जळगाव चे कलेक्टर साहेब आयुष प्रसाद यांनी एकत्रितपणे शेतकरी बोलवून तहसीलदारांना सुचना दिल्या.याच उद्देशाने महसूलमंत्री मा.ना.चंद्रशेखर बावनकुळे साहेबांची नागपूर येथे जाऊन भेट घेवुन..
या अभियानात अर्जदार शेतकऱ्यांना एकत्र बोलवून तहसीलदार समोर चर्चा घडवून आणली
चोपडा येथील तहसिलदार साहेब सन्माननीय भाऊसाहेब थोरात यांनी सुद्धा व्यस्त वेळेतून आमच्या मागणीसाठी वेळ दिला.शेतकऱ्यांमध्ये आपसात जुने वाद होते.ते सामोपचाराने सोडवले.वढोदा गावातील २१ शेतकऱ्यांना शेत रस्ता उपलब्ध करून दिला.
या कामात आम्ही फक्त अधिकारी आणि कायदा याचा वापर न करता प्रतिवादी शेतकऱ्यांना समजूत घातली.समझौता घडवून आणला.तहसिलदार साहेबांनी सर्व सहमतीने शेत रस्ता मंजूर केला.
या बद्दल आम्ही प्रतिवादी शेतकरी आणि तहसीलदार साहेबांचे आभार मानले. अशी माहिती जागृत मंचाचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी
दिनांक ४/११/२०२५ रोजी दुपारी 3 वाजता चोपडा तहसीलदार मा.भाऊसाहेब थोरात यांचा सत्कार केला.
शिवराम पाटील यांनी तहसीलदार साहेबांच्या कामाची विस्तृत माहिती दिली.शेत रस्ता ची 20 प्रकरणी रस्ता देऊन निकाली काढली
शेतकरी बांधवांनी चांगले काम केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली
चोपडा तहसीलदार साहेबांनी महाराष्ट्र जागृत जनमंचला सहकार्य केले.
संवाद करून, चर्चा ऑंटी तशिलदारांनी प्रश्न सोडवल्याने आभार व्यक्त होत आहेत.
यावेळी जळगाव चे राकेश वाघ,अमळनेरचे संतोष पाटील,खडगावचे रविंद्र पाटील,चोपडाचे दिलीप नेवे, बुधगाव चे सर्व्हेश साळुंखे,गरताडचे हिंमतराव पाटील,वेले चे संजय पाटील उपस्थित होते.
.