शेतकरी कृती समितीच्या वतीने सहकारमंत्र्यांना देखील अतिवृष्टीचा निकष चोपड्यासाठी शिथिल करण्याचे साकडे.....
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
. चोपडा...सहकार मंत्री बाबासाहेब पाटील चोपडा पीपल्स बँकेच्या घोडगाव शाखेच्या उद्घाटनासाठी आले असताना.चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भीषण अवस्थेकडे शेतकरी कृती समितीच्या वतीने निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.
त्यावेळी मंत्री महोदयांनी शक्य असेल तर प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करावी म्हणजे चोपडा तालुक्यातील सततच्या पावसाने झालेले नुकसान लक्षात येईल.परंतु निव्वळ अतिवृष्टी चे ६५मिमी पाऊस २४,तासात नाही हा निकष लावून शेतकऱ्यांना वंचित ठेवू नये. जसे इतर तालुक्यात ती अट शिथिल केली तशी शिथिल करावी.यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी देखील मंत्री महोदयांना लक्ष घालण्याची विनंती केली,या सोबत संपूर्ण कर्जमाफीची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनावर एस बी पाटील शशीकांत देवरे,शशिकांत पाटील,ललित बागुल,बाळासाहेब पाटील यांच्या सह्या आहेत.