मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे तहसीलदाराच्या दालनामध्ये निवडणूक तहसीलदार प्रदीप झांबरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना च्या विद्यमानाने पत्र देण्यात आले
गेल्या वर्षी महाराष्ट्र शासन सरकारने निवडणूक आधी आनंदा शिधा चालू केला होता त्यामुळे गोरगरिबांची दिवाळी या आनंदात साजरी व्हायची यावेळेस निर्णय मागे घेतल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र शेतकरी सेना यांनी पुन्हा ती योजना आनंदात शिधा या दिवाळीला सुद्धा द्यावा जेणेकरून दिवाळी आनंदात जाईल अतिवृष्टीमुळे शेतकरी मजूर गरिबांचे हाल झालेले आहेत घरातील शेतकऱ्यांचे भरलेला अन्नाचा साठा धान्य पाण्यात भिजलेले आहे किंवा अतिवृष्टीच्या पावसाने नासाडी झालेली आहे त्यामुळे दिवाळी सारखा मोठा सण नीरउत्साहित जाईल त्यामुळे राज्य सरकारने गोड भोजन (साखर, तेल,हरभऱ्याची डाळ, रवा,मैदा) थोडा तरी दिलासा शेतकरी मजूर गोरगरिबांना होईल त्यासाठी महाराष्ट्र शासन चा उपक्रम आनंद शिधा ह्या दिवाळीला सुद्धा द्यावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने निवेदन दिले
उपस्थित मनसे अध्यक्ष मधुकर भोई मनसे शेतकरी सेना अध्यक्ष विनोद पाटील गणाध्यक्ष सुनील कोळी शहराध्यक्ष मंगेश कोळी सरचिटणीस रवींद्र पाटील मजूर शेतकरी शेषराव पाटील उपस्थित होते