जंगलामध्ये पळस वृक्षाची लागवड मोठ्या प्रमाणात राहत होती. त्यापासून मोठ्या प्रमाणात जेवणासाठी पत्रावळी तसेच भाजी व इतर वस्तूसाठी द्रोण मोठ्या प्रमाणात बनवले जात होते सत्यनारायणाच्या पूजेचा तसेच मंदिरांमध्ये प्रसाद केळीचे पान अथवा पळसाच्या पानावर दिला जात असे सहसा लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध छोट्या मोठ्या कार्यक्रमात जेवणासाठी केळीचे पान भेटत नसल्यास पर्याय म्हणून पळसाच्या पानापासून बनवलेल्या पत्रावळीचा वापर होत असे. परंतु कालांतराने या झाडांची संख्या ही कमी झाली तसेच स्वस्तात कागदी त्यावर अत्यंत पतला प्लास्टिक पेपर त्यावरील गरम पदार्थामुळे हे विरघळून आपल्या पोटात जात असते. तसेच सिंगल युज प्लास्टिक द्रोण उपलब्ध झाल्याने ग्राहकांची पसंती स्वस्तात असल्यामुळे त्याचा वापर वाढून प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे अनेक धार्मिक ठिकाणी आरती झाल्यावर प्रसादाचे वाटप प्लास्टिकच्या द्रोण मध्ये वाटप केला जातो घरोघर सत्यनारायण पूजा होते त्याचा प्रसाद प्लास्टिकच्या छोट्या वाटीमध्ये देत असतात शक्यतो मंदीर ओपन स्पेस मध्ये असतात त्याकरता रस्त्यावर तसेचओपन स्पेस मध्ये पळसाची झाडे लावावी त्यामुळे तिथल्या तिथे आपणास पळसाची पानं उपलब्ध होऊन प्रसाद पळसाच्या पानावर किंवा त्यापासून बनवलेल्या द्रोणमध्ये देण्याचा संकल्प करा .त्याचा परिणाम पर्यावरणावर मोठ्या प्रमाणात होत आहे.कुठलाही धार्मिक विधी सत्यनारायणाची पूजा लग्नकार्य वाढदिवस देवांचे भंडारे पूजा विधि शक्यतो सुख समृद्धीसाठी तसेच संकट निवारणार्थ साठी करत असतो हे सर्व करत असताना निसर्ग निर्मीत सजीवांचे अस्तित्वासाठी सृष्टीसाठी आपण सर्व पर्यावरण पूरक वस्तू वापरणे हे आपले आद्य कर्तव्य आहे परंतु आपण पर्यावरणास हानी पोचवणाऱ्या वस्तू तेही धार्मिक कार्यात वापरतो म्हणजेच निसर्गाचा अनादर करत आहोत आपणास अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे कधी नाही ते यावर्षी आपणासएका ठिकाणी न होणारा ढगफुटीसदृश्य पाऊस जवळजवळ बहुसंख्य ठिकाणी होत असून शेती पूर्णतः वाहून गेली तसेच अनेक गुरे आपल्या डोळ्यासमोर वाहून गेले आपण काहीही करू शकलो नाही तसेच दिवाळी झाली तरी मोठ्या प्रमाणात गर्मीचे वातावरण अनुभवास मिळत आहे निसर्गास कोणीही रोखू शकत नाही वातावरणात प्रदूषण वाढू नये त्यासाठी आपणच जागृत राहणे गरजेचे आहे पत्रावळ्या बनविणे पुरत नसल्यामुळे हा उद्योग जवळजवळ बंद झाला. तरी पर्यावरण दृष्ट्या या उद्योगाला नव संजीवनी द्यावी तसेच वनविभामाने पुढाकार घेत पळसाच्या झाडांची लागवड पर्यावरण संतुलनासाठी मोठ्या प्रमाणात करावी त्यापासून पत्रावळी व द्रोण बनवण्यासाठी विविध बचत गटा मार्फत गृह उद्योग लघु उद्योगमार्फत सरकारने उद्योजकांना सहकार्य करत प्रोत्साहन द्यावे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान. वसंत ऋतु मध्ये पळसाच्या झाडाला गर्द केशरी रंगाची फुले येतात त्यामुळे हे झाड जंगलाची ज्वाला म्हणून मी ओळखले जाते या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार होतो तसेच पोटात जंत झाल्यास तसेच सर्दी खोकल्यासाठी याचा उपयोग होतो या झाडाच्या सालमधून बारीक द्रव्य पाझरत असतो. तो सुकल्यावर त्यापासून डिंक तयार होतो त्याला बुटीया गम म्हणतात. पळसाची पाने फुले पवित्र मानले जातात त्यामुळे पूजेकरता होममध्ये याच्या काड्यांना वापर होतो. असे हे बहुगुणी सर्वच गोष्टीत आवश्यक असलेले पळसाचे झाडे मोठ्या प्रमाणात लागवड होऊन त्यापासून तयार होणारे पत्रावळी व द्रोण यांची ही निर्मिती मोठ्या प्रमाणात होणे पर्यावरणासाठी अत्यंत आवश्यक आहे. असे मत डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी दिव्य महाराष्ट्र न्युज शी बोलतांना व्यक्त केले .