Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील 25 लाखाच्या चोरी प्रकरणी सहा जणांना अटक .तालुका पोलिसांची यशस्वी कामगिरी



भुसावळ येथील २५ लाखाची रोकड लंपास करणारी टोळी जेरबंद .
चालकच निघाला  सुत्रधार 
भुसावळ प्रतिनिधी 
 येथील २५.४२ लाखांच्या लुटीचा अवघ्या ४८ तासांत छडा पोलीसांनी लावला असून दुकान मालकाकडे असलेला ड्रायव्हरच  मुख्य सूत्रधार निघाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे .
या प्रकरणात ६ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून २३.४२ लाख रुपये हस्तगत केले आहे .
भुसावळ तालुका पोलिसांनी शहरातील गाजलेल्या २५.४२ लाख रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गु.र.नं. २०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात, फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माइल हे ज्या कंपनीत (रॉयल कंपनी) खाजगी नोकरी करतात, त्याच कंपनीचा ड्रायव्हर, शाहीद बेग, हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
घटनेची माहिती अशी की दिनांक २८ ऑक्टोबर रोजी रात्री २२:२० वाजता मोहम्मद यासीन हे त्यांच्या कार्यालयातील २५,४२,०००/- रुपये एका बॅगेत घेऊन मोटार सायकलने (एमएच १९ बीसी ५५८६) घरी जात होते. मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर, तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटार सायकलला धक्का दिला. फिर्यादीचा तोल गेल्यानंतर, आरोपींनी मोटार सायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशाची बॅग बळजबरीने हिसकावली होती व ते मोटार सायकलवर बसून पळून गेले.
याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
तपासाची चक्रे आणि गुन्ह्याची उकल:
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. 
तपासात फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय बळावला. चौकशीत, शाहीद बेगने गुन्ह्याचा कट रचल्याची कबुली दिली आहे .
 आरोपींना'टिप' देणार शाहीद बेग हा कंपनीत ड्रायव्हर असल्याने, त्याला पैशांच्या ने-आण करण्याच्या वेळेची माहिती होती.
 कट रचणारे त्यानेच अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची 'टिप' त्याचे साथीदार मुजाहीद मलीक आणि मोहम्मद दानिश यांना दिली. होती
  मुजाहीदने हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. घटनेच्या रात्री, या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला.
तपासात असेही निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमत करून कट रचून दरोडा टाकला आहे, त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी मध्ये
 शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) - मुख्य सूत्रधार / ड्रायव्हर
, मुजाहिद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ) , मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ) अजहर फरीद मलक (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) , अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) ,
ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर)  यांचा समावेश आहे .
आरोपींपैकी काही जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी  शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी  अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी २३,४२,०००/- रुपये जप्त करण्यात आले असून, उर्वरित २,००,०००/- रुपयांची रक्कम हस्तगत करणे बाकी आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल जप्त करणे आणि गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी, भुसावळ  न्यायालयाने आरोपींना  तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे . प्रस्तुत  कारवाई तालुका पो .स्टे .चे पोलीस निरीक्षक महेश  गायकवाड व त्यांच्या पथकाने केली आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.