Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करा व संपूर्ण कर्जमाफी जाहीर करा . शेतकरी कृती समितीची मागणी

चोपडा तालुका दुष्काळी जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी शेतकरी कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी साठी निवेदन.
..
चोपडा तालुक्याचे खरीपाच्या प्रमुख पिकात असलेले मका व कापूस यासह सारे पिकांचे नुकसान झाल्याने संपूर्ण हंगाम वाया गेला.
   तालुक्यात ऐन पिक वाढीच्या काळात ३० जुलै ते १४ऑगस्ट २०२५ या १५दिवसाचा पावसाचा खंड पडला, त्या संपूर्ण कालखंडात साऱ्या पिकाची वाढ खुंटली, मका चे बाबत त्या काळात दोन फुटाचे असताना निसवनी  झाली त्यामुळे उतारा कमी, नंतरचे काळात
काही गावात अतिवृष्टी झाली पण तेथे पाऊस मोजण्याचे रेणगेज नाही  त्यामुळे कागदावर अतिवृष्टी दिसत नाही,चहार्डी मंडळात एकदा, तर हातेड व लासूर मंडळात २४ तासात अतिवृष्टी इतका पाऊस झाला परंतु ती दोन दिवसात दिसत असल्याने आपला कायदा ग्राह्य कसा धरणार?त्यामुळे झालेले नुकसान कसे मोजावे?उर्वरित काळात मात्र सतत आठ दिवस कमी अधिक प्रमाणात का असेना परंतु सतत पाऊस पडल्याने कापसाचे झाडे मेली (पिक उभवले),त्या काळात कापसाची बोंड उलवले पाहिजे ते पावसाने काळवंडले व ऊन नसल्याने कवडी झाली तो कापूस आज ₹४५००/- ते ₹५०००/- चे भावाने द्यावा लागत आहे.
    दुर्दैवाने तालुक्याची पावसाची सरासरी देखील फक्त ७०%आहे.
  सरकारने ड्रोन ने सर्व्हे केला तर सारे हिरवेगार दिसेल ,पण उत्पादन मात्र २०%देखील नाही. 
    यासाठी सरकार ने प्रत्यक्ष नुकसान असल्याने चोपडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई मंजूर करावी व कर्जमाफी जाहीर करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
 तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी देखील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली असल्याने एकत्रित अहवाल आजच दुपारी मा मुख्यमंत्री महोदयांना सादर करण्यात येईल असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले.
  निवेदनावर एस बी पाटील(गणपूर)अजित पाटील(कठोरा),प्रशांत पाटील(चहार्डी),रमेश सोनवणे(हातेड खुर्द),डॉ रवींद्र निकम(माचला),डॉ सुभाष देसाई(चोपडा),कुलदीप पाटील(विरवाडे), ॲड हेमचंद्र पाटील(पंचकचंद्रकांत पाटील(गणपूर),मधुकर बाविस्कर(हिंगोणा)देविदास साळुंखे(चोपडा)युवराज पाटील (गणपूर),विश्राम धनगर (चौगाव)कांतीलाल पाटील(आखतवाडे),हरिश्चंद्र देशमुख(अडावद), धनंजय पाटील (घुमावल)गुणवंत वाघ(लासूर), दिनेश सोनवणे(हातेड बु),रामचंद्र बारेला (देवझिरी),सुभाष पाटील (पंचक),निलेश पाटील(पंचक),अजय पाटील (रुखणखेडा)
यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.