प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शिंदी येथील बैठकीत आवाहन
शिंदी, ता. भुसावळ ( गिरिष नेमाडे प्रतिनिधी )-- नागपूर येथे येत्या 28 ऑक्टोबरला प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यांच्या माध्यमातून महा एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे यासाठी गावोगावी संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी बैठका घेत असून शिंदी ता. भुसावळ येथे नुकतीच बैठक पार पडली. त्यावेळी आपल्या हक्कांसाठी एकजूट दाखवून शेतकरी म्हणून एकत्र येण्याचे आवाहन भुसावळ तालुका प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे यांनी असे आवाहन केले.
जिल्हा सल्लागार शरद बारजीभे यांच्या नेतृत्वात गावोगावी बैठका घेण्यात येत असून शनिवारी संध्याकाळी शिंदी येथील विठ्ठल मंदिर परिसरात बैठक घेण्यात आली. त्यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या महा एल्गार आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शेतकरी, दिव्यांग बांधव, विधवा, परीतक्त्या,व वंचित घटक यांना आवाहन करण्यात आले.
शेतीमालाला हमीभाव ,शेतकऱ्यांना कर्जमाफी, दिव्यांगांना दरमहा सहा हजार रुपये अनुदान, विविध वंचित घटकांना शासकीय सुविधांचा लाभ तत्पर मिळणे बाबत आदी मागण्यांसाठी लढा देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे भुसावळ तालुकाध्यक्ष दिलीप कोल्हे, अविनाश पाचपांडे, अनिल पाटील, डिगंबर येवले, देविदास गाडेकर, अतुल पाटील ,चिंधू राजाराम, शालीक कोळी, दीपक अडवकर ,चेतन कोळी, रमेश उबाळे, कमलबाई कोल्हे ,संगीता कोल्हे, रूख्क्माबाई कोळी, विनोद चौधरी ,सोपान लिधुरे, अशोक पाटील यांचेसह बहुसंख्य शेतकरी, दिव्यांग बांधव, विधवा- परितक्त्या महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागपूर येथील महाएल्गार आंदोलनात परिसरातील जनतेने सहभागी होण्याची आवाहन करण्यात आले