*परदेशी समाजामार्फत सत्कार.
*भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील भुमिपुञ व आदरणीय श्री. सुदाम अमरसिंग परदेशी साहेब यांची नुकतीच नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती शासनामार्फत करण्यात आलेली आहे. ते यापुर्वी अंधेरी मुंबई येथे मुद्रांक जिल्हाधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यांची अंधेरी मुंबई येथुन नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयात पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते नाशिक येथे लवकरच रुजु होऊन पदाचा चार्ज घेणार आहेत. त्यांनी आतापर्यंत एकुण २० वर्ष त्यांनी यापुर्वी कराड जिल्हा सातारा, जुन्नर पुणे, ठाणे* पनवेल, *अंधेरी मुंबई येथे सेवा बजावलेली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचा भडगावचे माजी* *नगराध्यक्ष आदरणीय श्री. गणेश आण्णा परदेशी, परदेशी, मिणा, राजपुत समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुरेशभाऊ कोंडु परदेशी, समाजाचे तंटामुक्ती जळगाव जिल्हा अध्यक्ष विनोदभाऊ परदेशी, समाजाचे तालुका अध्यक्ष अशोकबाप्पु परदेशी, समाजाचे चाळीसगाव तालुका अध्यक्ष श्री. भगवान परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त अभियंता श्री. प्रकाश परदेशी साहेब, *श्री.* *आकाश परदेशी यांचेसह समाजबांधवांनी सत्कार केला.*
—