लक्ष्मीपूजन नंतर सर्वात महत्त्वाचा सण पाडवा सकाळीच सर्व महिलांनी आपल्या पतीला ओवाळत त्यांना निरोगी दीर्घायुष्य सुख समृद्धी तसेच भरभराटीसाठी प्रार्थना केली यमराजाला सुद्धा दीर्घायुष्य लाभण्याच्या दृष्टीने विनंती केली तसेच लगेच भाऊबीज भाऊबीजेला बहीण भावाला ओवाळत भावाला निरोगी दीर्घायुष्य सर्व प्रकारचे सुख समृद्धी त्याची भरभराट होत राहो यासाठी प्रार्थना करते जसे पत्नीचे पतीवर तसेच बहिणीचे भावावर अतूट प्रेम असते. या सर्व गोष्टीसाठी पर्यावरणाचा समतोल असणे खूप महत्त्वाचा आहे सद्यस्थितीत निसर्गनिर्मित साधन संपत्तीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम होत निसर्गावर त्याचा मोठा परिणाम झालेला आहे निसर्गास कोणीही थांबवू शकत नाही उदाहरण आपणास कधीही न झालेल्या संकटांचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे आपल्या येथील अनेक ठिकाणी कधीही न होणारा ढगफुटी सदृश्य पाऊस त्यामुळे अनेक गुराढोरे घरे शेत आपल्या डोळ्यासमोर वाहून गेले आपण काहीही करू शकलो नाही तसेच यावर्षी पावसाळा संपून दिवाळी आली तरी थंडी न पडता आपणास गर्मीला सामोरे जावे लागत आहे निसर्गाने एक प्रकारे आपणास संदेश दिलेला आहे आपण त्यातून सुधारणा नाही केली तर पृथ्वीचा अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही तरी महिलांनी निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व राहण्यासाठी सर्व प्रकारचे फळे फुले आयुर्वेदिक तसेच विविध प्रकारचे वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे आपल्या सहित सर्व घरातील सदस्यांमार्फत संगोपनासहित झाडे लावावी. तसा आपले आदरणीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार एक पेड माँ के लिये अभियान 2 अंतर्गत सहभाग सुद्धा होईल. तसेच सद्यस्थितीत आपल्या देशामध्ये प्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या निर्माण होऊन त्यामुळे नाले नाल्यातून नद्या नद्यातून समुद्र अशा ठिकाणी जाऊन पर्यावरणावर त्याचा खूप मोठा परिणाम होत आहे तरी महिलांनी जर ठरवले तर प्लास्टिकचा वापर सुद्धा होणार नाही. सद्यस्थितीत निदान सिंगल युज प्लास्टिकचा वापर होणार नाही निदान वृक्षारोपण तसेच प्लास्टिकचा वापर होऊ न देणे या दोन गोष्टी महिलां द्वारे होऊ शकते. तसेच प्रत्येकाने आवश्यक असेल तेथेच गाडीचा वापर करावा तसेच बाहेरगावी जाताना सार्वजनिक वाहनाचा वापर करावा हेही बऱ्याच प्रमाणात महिलांवर अवलंबून आहे. तसेच पाण्याचा वापर काटकसरीने करावा हे पूर्णतः महिला वर्गावर अवलंबून आहे तसेच विविध कार्यक्रमांमध्ये भयंकर असा कर्कश आवाज असतो त्याच प्रतिबंध घालावा हेही महिला वर्गावर अवलंबून आहे . एकंदरीत माणसांबरोबर महिलांचाही सहभाग असल्यास पर्यावरण पूरक वातावरणाची मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊन पृथ्वीचे संरक्षण होण्यास मदत होईल. तरी सर्व महिलांनी आपल्यासाठी , कुटुंबासाठी निसर्गासाठी भूमातेसाठी पृथ्वीसाठी पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करावा . डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान जय पृथ्वी देवता ,जय निसर्ग देवता, जय भूमाता ,जय वृक्ष देवता, जय पर्यावरण
पाडवा व भाऊबीज दिनी वृक्षारोपण करून पर्यावरण रूपी भेट दया . डॉ सुरेंद्रसिंग पाटील
October 23, 2025
0
*पाडवा दिनी पत्नी पतीला लगेच भाऊबीज दिनी बहिण भावाला निरोगी दीर्घायुष्य सुखसमृद्धीसाठी ओवाळते या सर्वांसाठी स्वच्छ व शुद्ध वातावरण हवे असते यासाठी महिलांनी संगोपनासहित वृक्षारोपण करून सर्वांना पर्यावरणपूरक गोष्टींसाठी परावृत्त करावे. - डॉ सुरेंद्रसिंग पाटील*.