भुसावळ प्रतिनिधी
भुसावळ येथील शहर पोलीस स्टेशन हद्दीत ५५ वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना २० ऑक्टोबर रोजी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे .
याबाबत माहिती अशी की येथील मुख्य पार्सल कार्यालयाच्या गेट जवळ अज्ञात इसम बेशुद्धावस्थेत पडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असता घटनास्थळी जावून सदर इसमास ट्रामा सेंटर दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले आहे .
अनोळखी पुरुष जातीचे प्रेत, असून वय अंदाजे ५५ वर्षे , अंगात निळ्या रंगाची फुल पॅन्ट, सफेद रंगाचे फुल बाही शर्ट, नाक सरळ, केस काळे, डोक्यावर अर्धवट एक्का पडलेले, नाक सरळ, रंग सावळा, चेहरा लांबट, हनुवटी व काळी पांढरी दाढी असे मयताचे वर्णन आहे .
या प्रकरणी धर्मेंद्र तिवारी यांनी दिलेल्या खबरी वरून भुसावळ शहर स्टेशनला गुरं नं ३४ / २०२५ ,बी एन एस एस १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
सदर इसमाबाबत कोणाला माहिती असल्यास शहर पो .स्टे. च्या पोलीस उपनिरिक्षक शालीनी वलके यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे .