Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दिवाळी पर्वात आरोग्यमय जिवनासाठी वृक्ष लागवड करणे आवश्यक - पर्यावरण मित्र डॉ सुरेंद्र सिंग पाटील

*दिवाळीच्या वसुबारस ते भाऊबीजपर्यंत असलेल्या मंगलमय पर्वानिमित्त सर्वजण   सुखः शांती धनसमृद्धी प्रगती, भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देत आहोत या सर्वांबरोबर आरोग्य महत्त्वाचे आहे त्यासाठी  संगोपणासहित वृक्ष लागवड महत्त्वाचे आहे.    डॉ. सुरेंद्रसिंग  पाटील .        वसुबारस पासून सुरू झालेला दिवाळीचा सण भाऊबीज पर्यंत असतो. दिवाळीचा सण सर्व दूर मोठ्या हर्षोल्हासने साजरा करता या दिवसांमध्ये अत्यंत उल्हासाचे व आनंदाचे वातावरण सर्व घरांमध्येअसते.                                     .           यावर्षी 17 ऑक्टोंबर पासून म्हणजे वसुबारस पासून सुरू झालेल्या दिवाळीत आपण वसुबारस मोठ्या उत्साहाने गाय  वासरू यांची पूजा करून त्यांना नैवेद्य  दाखवून साजरा केला तसेच दिवाळीला एक गाणं आहे दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी आपण गाय वासरूची पूजा मोठ्या उत्साहाने केली परंतु यांना लागणारे निसर्गनिर्मित खाद्य बांधावरचे गवत आपण विविध प्रकारचे फवारे मारून नष्ट करत असतो. तसेच बांधबंधारा काढून जमीन लेवल करत असतो गुराढोरांसाठी अमृत असलेले बांधावरचे गवत याचा दुहेरी फायदा असतो पहिल्या पावसानंतर बांध कायम ठेवून  गवताची निर्मिती झाल्यावर ते गवत मातीला वाहू देत नाही. यावर्षी महाराष्ट्रात बहुसंख्य ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने बांध बंधारे नसल्यामुळे बरीचशी शेती वाहून गेली तरी आपण गुराढोरांसाठी व आपले शेतातील मातीचे संरक्षण करण्यासाठी पूर्वीप्रमाणे येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत शेतामध्ये बांध  टाकण्याचा संकल्प करावा                                             18 ऑक्टोंबर धनत्रयोदशी त्यादिवशी आपण आपल्या जवळ असलेल्या धनाची पूजा करत असतो व धन्वंतरी आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याजवळ असलेल्यात वृद्धी व्हावी या दृष्टीने ईश्वरा जवळ प्रार्थना करत असतो धनसंपत्ती बरोबर आपण निरोगी व आरोग्यदायी जीवन जगावे या दृष्टीने प्रार्थना करत असतो परंतु या सर्व गोष्टीसाठी निसर्ग देवतेची साथ आवश्यक आहे  पृथ्वीवरील वातावरण चांगले असणे महत्त्वाचे आहे सद्यस्थितीत निसर्गनिर्मित संपत्तीत घट होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आपणास अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे तरी प्रत्येकाने एक पेड माँ के लिये अभियान 2 अंतर्गत भाऊबीज पर्यंत संगोपनासहित वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे विविध प्रकारचे वृक्ष  लावा            20 ऑक्टोबर नरक चतुर्दशी या दिवशी आपण अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आपणास शक्ती प्रदान होण्यासाठी प्रार्थना करतो 21 ऑक्टोंबर लक्ष्मीपूजन लक्ष्मीपूजन म्हणजे  लक्ष्मी मातेच्या कृपेने आपणास धनप्राप्ती कायम मिळत राहो लक्ष्मी देवीचा वास कायम असावा अशी विनंती करत असतो घरची लक्ष्मी प्रसन्न असेल तर सारे घर आनंदी असते. नुसती पैशाच्या रूपात लक्ष्मी प्राप्त होऊन उपयोग नसतो आपल्याजवळ भरपूर असल्यावर सुद्धा आहे त्यात आपण समाधानी नाही त्यासाठी आपले व आपल्याबरोबर इतरांचेही आरोग्य चांगले असणे महत्त्वाचे आहे निसर्गनिर्मित संपत्ती मोठ्या प्रमाणात घट झाल्याने पर्यावरण असमतोल निर्माण झाला आहे काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झालेली आहे आपणास व आपल्याबरोबर निसर्गनिर्मित एकमेकांना पूरक सर्व सजीवांना  आयुष्य जगण्यासाठी विविध प्रकारच्या झाडांची आवश्यकता आहे आपण प्रत्येकाने किमान एक तरी झाड संगोपनासहित लावून आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार एक पेड माँ के लिये अभियान 2 अंतर्गत सहभाग नोंदवा. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान                      22 ऑक्टोबर पाडवा पाडव्याला घरची लक्ष्मी आपल्या माणसाची पूजा करून निरोगी आयुष्याचा आशीर्वाद मागत असते निरोगी आयुष्यासाठी पर्यावरणाचा समतोल असणे गरजेचे आहे निसर्गनिर्मित संपत्तीत घट झाल्याने प्रत्येकाने संगोपना सहित वृक्ष लावून आदरणीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार एक पेड माँ के लिये अभियान 2 अंतर्गत सहभाग नोंदवा दोघांनी एकमेकांना वृक्ष भेट देऊन वृक्षारोपण करावे.                        23 ऑक्टोबर भाऊबीज भाऊबीज सणाला अत्यंत महत्त्व आहे त्यादिवशी बहीण भावाला ओवाळून आपल्या भावाला निरोगी  आयुष्य लाभो अशी प्रार्थना देवाजवळ भावासाठी करत असते निरोगी शरीरासाठी सद्यस्थितीत निसर्गनिर्मित साधनसंपत्तीत मोठ्या प्रमाणात घट होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडल्यामुळे आपणास अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे पृथ्वीचे अस्तित्व धोक्यात आले आहे  बहिण भावांना एकमेकांची खूप काळजी असते त्याचप्रमाणे निसर्ग देवतेला पर्यावरणाचा समतोल राहण्यासाठी निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व कायम असणे महत्त्वाचे आहे त्यानिमित्ताने एकमेकांना  परिवारासहित विविध प्रकारचे फळ फुल वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणारे वृक्ष देऊन संगोपनासहित वृक्ष देवतेची स्थापना करत आदरणीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार असलेल्या किमान एक पेड माँ के लिये अभियान 2 अंतर्गत सहभाग नोंदवा . आपल्या लहानपणी जसे वातावरण होते शेतांमध्ये विविध प्रकारचे फळांचे झाडे दीर्घ काळापासून असलेले वटवृक्ष विविध झाडांवर खेळण्यासाठी तसेच लहान मुलांना झोपवण्यासाठी असलेले झोके स्वच्छ व शुद्ध वातावरण त्यासाठी विविध प्रकारचे फुलांची झाडे आपल्या पुढील पिढीला निरोगी जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत असे  डॉ सुरेंद्सिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी सांगितले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.