शिक्षकांनी दिवाळी अभ्यासक्रम पुस्तिकेचे केले मोफत वाटप.
जि.प. प्राथ. शाळा काहुरखेडे ता. भुसावळ
या शाळेमध्ये इ. पहिली ते इयत्ता पाचवीच्या 65 विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे, उपशिक्षक जि प आदर्श शिक्षक तथा नूतन शिक्षक पतपेढी भुसावळ संचालक समाधान जाधव, उपशिक्षिका ममता तडवी या तिन्ही शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांना मोफत दिवाळी अभ्यासक्रम पुस्तकांचे वाटप केले.
प्रत्येक इयत्तेचे दिवाळी अभ्यासक्रम पुस्तक हे 30 ते 40 पानांचे आहे.
प्रत्येक इयत्तेतील पुस्तिकेमध्ये भाषा, इंग्रजी, गणित आणि सेमी इंग्रजी गणित या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रम दिलेला आहे.
दिवाळी अभ्यासक्रम पुस्तिका ही अत्यंत सोपी, सुलभ, उपयुक्त आणि सुटसुटीत असून विद्यार्थ्यांना उत्तरे लिहिण्यासाठी जागा दिलेली आहे. त्याचबरोबर विविध चित्र दिली असून ते रंगवण्यास विद्यार्थ्यांना मनोरंजक वाटणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला सुरवाडे आणि उपशिक्षिका ममता तडवी, उपशिक्षक समाधान जाधव या तिन्ही शिक्षकांनी मिळून परिश्रम घेतले.
उपशिक्षक समाधान जाधव आणि उज्वला सुरवाडे मॅडम यांची नुकतीच 18 सप्टेंबर रोजी काहूरखेडे या शाळेमध्ये बदली झालेली आहे. या उपक्रमाबद्दल गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचे पालक यांनी कौतुक केले.
त्याचबरोबर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दिवाळीसाठी आकाश कंदील तयार करण्याचे प्रात्यक्षिक देऊन विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारचे आकाश कंदील तयार करून घेतले. यासाठी सर्व शिक्षकांचे गावकरी अभिनंदन आणि कौतुक करीत आहेत.