Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शासकिय तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धेत थोरगव्हाण हायस्कूलचे यश

शासकीय तालुका क्रीडा स्पर्धेत थोरगव्हाण विद्यालयाचा ठसा: प्रथम द्वितीय क्रमांक प्राप्त स्पर्धेक यांची  जिल्हास्तरावर निवड

 शासनाच्या वतीने आयोजित शासकीय तालुका क्रीडा स्पर्धा वर्ष २०२५-२६ दि. २९ व ३० सप्टेंबर ०१ ऑक्टोबर रोजी रावेर येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण (ता. रावेर) येथील १४ वर्षे व १७ वर्षे१९ वर्षे वयोगटातील मुला-मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या विद्यालयाचा ठसा रावेर तालुक्यात उमटविला. गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडाफेक, लांबउडी, उंचउडी, तिहेरी उडी या वैयक्तिक खेळांमध्ये थोरगव्हाण विद्यालयाने एकापेक्षा एक पदके पटकावून सर्वांचे लक्ष वेधले.
१४ वर्षे वयोगट – मुली
अर्चना संजय लहासे – गोळाफेक, थाळीफेक, लांबउडी – प्रथम क्रमांक (हॅटट्रिक विजेतेपद)
जयश्री प्रवीण सोनार (८ वी) – लांबउडी – द्वितीय
साक्षी सचिन कोळी (७ वी) – थाळीफेक – तृतीय
१७ वर्षे वयोगट – मुली
डिंपल प्रवीण काळे (१० वी) – थाळीफेक – प्रथम
योगेश्वरी राहुल बाऊस्कर (९ वी) – थाळीफेक – द्वितीय
जागृती धनराज पाटील (९ वी) – भालाफेक – प्रथम
हेमल मोहन कोळी (९ वी) – भालाफेक – द्वितीय
रितिका मिराज मेढे (१० वी) – हातोडाफेक – प्रथम
जयश्री प्रवीण सोनार (१० वी) – गोळाफेक – द्वितीय
१४ वर्षे वयोगट – मुले
तेजस युवराज तायडे (८ वी) – गोळाफेक – द्वितीय
ईश्वर विनोद सुरळकर (७ वी) – थाळीफेक – द्वितीय
१७ वर्षे वयोगट – मुले
मोहित निलेश झोपे – थाळीफेक व तिहेरी उडी – प्रथम, भालाफेक – तृतीय, कुणाल रविंद्र तायडे १०वी  हातोडाफेक – प्रथम क्रमांक
१९ वर्षे वयोगट – मुली
सरिता संजय मोहासे (११ वी) – गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक
या स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवणाऱ्या स्पर्धकांची निवड आता जळगाव येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी झाली आहे.
खेळाडूंना क्रीडाशिक्षक श्री. जे. ए. चौधरी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्यासोबत श्री. एन. बी. चौधरी व सौ. जे. पी. चौधरी , के एम पाटील यांनीही सहकार्य केले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाणचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष श्री. उमाकांत बाऊस्कर, सचिव श्री. पवनकुमार चौधरी, सहसचिव श्री. रामराव देशमुख व समस्त सन्माननीय संचालक मंडळ यांनी सर्व विजयी खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ' पालक संघ  सर्व यशस्वी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे मनोगत
आमच्या थोरगव्हाण विद्यालयातील विद्यार्थी ग्रामीण भागात असूनसुद्धा क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव तालुका स्तरावर उज्ज्वल करीत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. आता या स्पर्धकांनी जळगाव येथे होणाऱ्या जिल्हा पातळीवरील स्पर्धेतही यश मिळवून राज्यस्तर गाठावे, हीच अपेक्षा आहे सर्वांना शुभेच्छा. सोसायटी व विद्यालयाकडून खेळाडूंना आवश्यक ते सहकार्य दिले जाईल,” असे मनोगत अध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.