Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


महसुल कर्मचारी शेतकऱ्याच्या बांधावर परंतु शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत

महसूल कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेती बांधावर
शेतकऱ्यांना मात्र अनुदानाची प्रतीक्षाच


गोंडगाव तालुका भडगाव येथे महसूल कर्मचारी तलाठी धनलक्ष्मी टेंभुणे मॅडम कृषी सहाय्यक पोलीस पाटील पत्रकार गावातील प्रतिष्ठित नागरिक शेतकरी यांच्या उपस्थितीत दलवाडे गोंडगाव नावरे शिवारात शेतीची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली खरीप हंगाम पूर्णतःह धोक्यात आला असून शेतकऱ्यांचा टाकलेला खर्च देखील निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मका सोयाबीन मोसंबी लिंबू फळ बागायतदार शेतकऱ्यांच्या कापूस वेचणीला लगाम लावत संपूर्ण सप्टेंबर महिना पाण्यात गेल्याने तेल गेलं तूप गेलं आणि हाती धुपाटने आलं अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली असताना शासन सांगते की संपूर्ण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे दिवाळी पूर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ओला दुष्काळाची रक्कम जमा होईल असे आश्वासन मिळत असताना हातात पैसे नसताना रब्बी हंगामाची पेरणी कशी करावी अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे
गोंडगाव तालुका भडगाव येथील शेतकरी गोविंदा भिकाजी पाटील नाना भिकाजी पाटील हिरालाल भिकाजी पाटीलयांचे संपूर्ण शेत पाण्याखाली गेल्याने शंभर टक्के नुकसान झाले असून शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.