Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख हायस्कूल मध्ये अपूर्व विज्ञान मेळावा संपन्न

देशमुख विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळावा – ३० मॉडेल्समधून बाल वैज्ञानिकांची चमकदार सादरीकरणे 

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व शोधकवृत्ती विकसित व्हावी, या उद्देशाने डी. एस. देशमुख विद्यालय, थोरगव्हाण येथे दि. १२ सप्टेंबर रोजी अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत झालेल्या मेळाव्यात बाल वैज्ञानिक विद्यार्थ्यांनी तब्बल ३० मॉडेल्स व प्रकल्पांचे सादरीकरण करून विज्ञानाचे रहस्य उलगडले.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान संस्थेचे संचालक व शालेय समिती सदस्य प्रा. एस. एच. चौधरी (सेवानिवृत्त भौतिकशास्त्र प्राध्यापक) यांनी भूषवले. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.

प्रा. एस एच चौधरी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड व शोधकवृत्ती जोपासणे हीच खरी शैक्षणिक गरज असल्याचे सांगितले. बाल वैज्ञानिकांनी मांडलेले प्रकल्प पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या प्रकल्पांचे बारकावे, साहित्य व उपयुक्तता याची सविस्तर माहिती देत परीक्षकांशी संवाद साधला.

या मेळाव्यातील परीक्षक म्हणून प्रा. एस. एच. चौधरी, नंदकुमार एकनाथ चौधरी, के. पी. चौधरी, एस. पी. पाटील व सौ. योगिता संजय झोपे यांनी प्रकल्पांचे परीक्षण केले.

मेळाव्यात संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत वसंत बाऊस्कर, शालेय समिती सदस्य नंदकुमार एकनाथ चौधरी, मुख्याध्यापक डी. के. पाटील, पालक संघ सह सचिव अमोल चक्रे आदि मान्यवर उपस्थित होते . विज्ञान समिती प्रमुख के. पी. चौधरी, एन. बी. चौधरी, एस. पी. पाटील, पी. सी. कचरे, सौ. योगिता संजय झोपे हे  उपस्थित होते.

मेळाव्याचे सूत्रसंचालन विज्ञान शिक्षक के. पी. चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन समिती सदस्य पी. सी. कचरे यांनी केले. मुख्याध्यापक डी. के. पाटील आणि उपशिक्षक युवराज कुरकुरे यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

शालेय विज्ञान समितीच्या पुढाकाराने झालेला हा मेळावा विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणीव निर्माण करण्यासाठी उपयुक्त व प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.