थोरगव्हाण – दि. १३ सप्टेंबर रोजी डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात " १४ सप्टेंबर हिंदी दिन " उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक के एम. पाटील यांनी परिपाठातून हिंदीचे महत्व विशद केले. त्यांनी हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून असलेली भूमिका, तिचा गौरवशाली इतिहास व व्यावहारिक उपयोग विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखवला.
मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी सर्वांना हिंदी दिनाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवाहन केले की, या दिवशी सर्वांनी परस्पर संवाद हिंदीत साधावा.
सर्व हिंदी विषय समिती शिक्षक शिक्षिका कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.