Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वातावरण शुद्ध राहण्या साठी शाळेच्या आवारात आक्सीजन युक्त झाडे लावा - डॉ सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

*शासनातर्फे आतापर्यंत स्वच्छ, सुंदर, शाळा असा होता. आता  स्वच्छ सुंदर हरित शाळा असा  आहे  पुरस्कारासाठी शाळेच्या आवारातऑक्सिजनयुक्त झाडे आवश्यक केल्यास शाळेचे वातावरण शुद्ध राहील.                                    डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*                      सामाजिक वनविभाग यांच्याकडून दरवर्षी 200 झाडे अमृत वृक्ष आपल्या दारी विद्यार्थ्यांना शालेय जीवनात आवड निर्माण व्हावी तसेच झाडे सुरक्षित राहण्याकरिता शाळांना कंपाउंड वॉल असल्याने सुरक्षा करण्याची गरज नसते  प्रथम गुरु आपली माता आहे त्यानंतर द्वितीय गुरु धरती माता आहे धरतीमातेबद्दल आवड निर्माण होऊन धरती मातेला आवश्यक असलेले निसर्गनिर्मित सजीवांना आवश्यक असलेले विविध प्रकारचे तसेच ऑक्सिजन निर्माण करणारे वृक्षदेवतेची ओळख करून वृक्षारोपणाचे संस्कार रुजवत वृक्षदेवतेची संगोपनसहित स्थापना करत त्या झाडांचे महत्त्व व काय कार्य करतात याची माहिती व तिच्या सुरक्षेची जाणीव तसेच काही कारणास्तव निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे नुकसान होऊन पर्यावरणावर मोठा परिणाम झाल्याने आपणास अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या येथील प्रदूषण कशाकशाद्वारे होत आहे व त्यासाठी काय काय उपाय योजना करावे लागते याचे शालेय जीवनात सवय करण्याचं काम शिक्षकांशिवाय कोणीही करू शकत नाही. यावर्षी प्रत्येक शाळेला वनीकरण विभागाकडून 15 जून पासून सुरू झालेले 30 सप्टेंबर पर्यंत आदरणीय पंतप्रधान यांच्या संकल्पनेनुसार, " एक पेड मॉ के नाम "अभियान 2  अंतर्गत वनविभागाकडून शाळांना एक रुपया प्रमाणे 200 झाडे 15 जून पासून सुरू झालेले 30 सप्टेंबर पर्यंत मिळणार आहेत वनविभाग जरी शालेय जीवनात विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयी आवड  निर्माण व्हावी याकरिता झाडे देत आहे परंतु स्वच्छ, सुंदर, हरित यामध्ये दीर्घकाळ टिकणारे व ऑक्सिजन व वातावरण प्रसन्न करणाऱ्या झाडांना मार्क्स दिसत नसल्याने शिक्षक झाडे लावण्यास महत्त्व देत नसावे. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान परंतु शिक्षकांचा आदेश विद्यार्थी पाळतात तरी निसर्गाप्रती आपले कर्तव्य म्हणून शाळेला कंपाऊंड असल्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून झाडे लावून घ्यावे तसेच ज्या ठिकाणी कंपाउंड आहे उदाहरणार्थ दवाखाने स्मशानभूमी येथे जागा आहेत तरी शाळेतील जे विद्यार्थी झाडे लावण्यास तयार असतील किंवा इतरही संगोपना सहित कोणी लावणार असेल त्यांच्यामार्फत लावून घ्यावे. तसेच सध्या प्लास्टिक विघटन होत नसल्याने नद्या नाले त्यामुळे पॅक होत आहे त्यामुळे घाण पाणी रस्त्यावर येत असल्यानेप्लास्टिक कचऱ्याची मोठी समस्या आहे तरी प्लास्टिकचा वापर टाळूया सिंगल युजचा वापर करूच नये            बाहेर गावाला सार्वजनिक वाहनाद्वारे प्रवास करून  गावात एक किलोमीटर साठी गाडीचा वापर टाळावा व वायू प्रदूषण कमी करूया ध्वनी टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी कर्कश आवाज टाळूया आवश्यक असेल तेथेच पाण्याचा वापर करून अतिरिक्त पाण्याचा वापर टाळून पाणी वाचवा  व पृथ्वीचे रक्षण करूया.                                    जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुलगुरू प्राथमिक, माध्यमिक  शिक्षणाधिकारी, सर्वांनी सर्व शाळा कॉलेजेस यांना जनतेमध्ये आवड निर्माण होण्यासाठी पर्यावरण जनजागृती रॅली काढण्याचे आदेश द्यावे  सीबीएससी शाळेने डायबिटीस न होण्याच्या दृष्टीने भिंतीवर जे काही लिहिण्यास सांगितले आहे तसेच आपल्या सर्व शाळांमध्ये सांगावे, त्यानंतर बहुसंख्यजणांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्याने ॲनिमिया न होण्यासाठी  सरकारी दवाखान्या मार्फत अंगणवाडी सेविका जनजागृती करत सरकारी दवाखान्यात मिळणाऱ्या घरोघरी गोळ्यांचे वाटप करावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.