Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जुनोना येथे स्व .ललित देशमुख यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य व भोजन वाटप

जुनोना दिगर येथे स्व. ललित अशोकराव देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरण शालेय साहित्य वाटप व स्नेहभोजनाने संपन्न .

जुनोना (ता. बोदवड) – जि.प. शाळा जुनोना दिगर चे माजी मुख्याध्यापक स्व. ललित अशोकराव देशमुख यांचे प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या वडिलांनी अशोकराव अनंतराव देशमुख (मूळ रहिवासी यावल हमु, वरणगाव) यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून गोड स्नेहभोजन देण्यात आले.

विद्यमान प्रभारी मुख्याध्यापक संजय मोरे व शालेय समिती अध्यक्ष नामदेव तोरे यांच्या उपस्थितीत शाळेतील  ५२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी रायटिंग पॅड,  ६ वह्या, कंपास बॉक्स, कलर पेटी आणि भूमितीय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी स्व. ललित देशमुख यांचे बंधू निलेश देशमुख, सौ. योगिता देशमुख, शौर्य देशमुख, कु. अनया (स्वरा) देशमुख यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. देशमुख परिवाराचे मुख्याध्यापकांनी मनःपूर्वक आभार मानले. शोकसभेत स्व. ललित देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्व ललित देशमुख यांचे हसत खेळत शिकवण्याच्या स्मृती जागृत केल्या .

यापूर्वीही देशमुख परिवाराने ४० हजार रुपये शालेय समितीच्या नावे बँकेत ठेवले असून, त्यावरील व्याजातून पहिली ते चौथी वर्गातील प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रकीया सुलभ होणार आहे असे प्रभारी मुख्याध्यापक यांनी मनोगतात सांगितलेग्रामस्थ जुनोना व परिसरातील दिग्गजांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.