Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बालभारती इंग्रजी विषय समितीवर भरत शिरसाठ यांची निवड झाल्याबद्दल सत्कार

*बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल भरत शिरसाठ यांचा संस्थेमार्फत सत्कार*

एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ एरंडोल मार्फत चालवलेल्या जे. एस. जाजू हायस्कूल उत्राण विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री. भरत शिरसाठ यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या  बालभारती इंग्रजी विषय पाठ्यपुस्तक समितीवर निवड झाल्याबद्दल एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, एरंडोल संस्थेच्या वतीने त्यांचा संस्थेचे अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष व सर्व कार्यकारिणी सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. श्री. भरत शिरसाठ यांनी या अगोदर नाशिक विभाग इंग्रजी विषय सहाय्यक म्हणून सुद्धा काम केले आहे. इलिस आणि चेस इंग्रजी विषय प्रोजेक्ट मध्ये जळगाव जिल्हा मेंटॉर आणि एमइआर म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. इंडिया बांगलादेश टेलिकोलॅबोरेशन  प्रोजेक्टचे जळगाव जिल्ह्याचे ते समन्वयक होते. एससीईआरटी च्या वरिष्ठ व निवड श्रेणी मार्गदर्शिका लेखन समिती सदस्य म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. अनेक प्रशिक्षणांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम केले आहे.
        सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. शरदचंद्र काबरा, श्री. राजूभाऊ मणियार, श्री. सतीश भाऊ परदेशी, डाॅ. नितीन राठी, श्री. अनीलभाऊ बिर्ला,  श्री. सुनील भाऊ झवर, श्री. प्रविण भाऊ झवर, डाॅ. अजय बियाणी, श्री.परेश बिर्ला, श्री. जगदीश बिर्ला, श्री.धीरज काबरा, श्री. सतिष काबरा, श्री. यश मणियार, रा.ति. काबरे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सुनील राठी, स. नं.  झवर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. पी. पाटील, रा.ही. जाजू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. जयश्री कुलकर्णी, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल एरंडोल चे प्राचार्य हैरी जॉर्ज  इत्यादी उपस्थित होते. ज्येष्ठ शिक्षक श्री. आर.एम. कुलकर्णी सर यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.