Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथील प्रवर्तन चौकात स्वच्छता गृह उभारण्याची मनसेची मागणी

प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथे तात्काळ स्वच्छतागृह उभारण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन इशारा मनसेने दिलेला आहे.
गेल्या सात महिन्यापासून प्रवर्तन चौक मुक्ताईनगर येथे शिवाजी पुतळ्याची उभारणी केली गेली त्यापुढे स्वच्छतागृह स्त्री पुरुष यांचे होते ते हटवल्या गेल्यामुळे आज दैनंदिन व्यवस्था पुरुषांची कमी आणि महिलांची जास्त होत आहे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे पुरुषांना सूर्या लॉज बाजूला लघवी घर आहे परंतु महिलांना लघवी घर मुळीच नाही अत्यंत दैनिक व्यवस्था महिला व पुरुष प्रवाशांची प्रवर्तन चौक मुक्ताईनगर मध्ये झालेली आहे त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुक्ताईनगर महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या माध्यमातून मुक्ताईनगर नगरपंचायत चे सहाय्यक मुख्याधिकारी पंकज बावस्कर यांना पत्राद्वारे मनसेचा इशारा देण्यात आला आहे
काही दिवसावर नवरात्र उत्सव सुरू होणार आहे खेड्यापासून येणाऱ्या माता भगिनी शहरात दाखल होणार आहे स्वच्छालय व्यवस्था नाही त्यामुळे मानसिक ताण महिलांचे पुरुषांचा वाढला आहे दुर्गा देवीचा या आगमनाचा आपण आशीर्वाद घ्यावा अन्यथा प्रकोप सहन प्रकोप सहन करावा लागणार आहे हे ध्यानात ठेवावे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळीच खपवून घेणार नाही दोन दिवसात सुरू स्वच्छालय किंवा लघवी करायची व्यवस्था झाली नाही तर प्रवर्तन चौक ते नगरपंचायत मुक्ताईनगर येथे भव्य मोर्चा  निघणार असे मनसेचे मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष मधुकर भोई यांनी  माहिती देताना सांगितले आहे उपस्थित मनसे तालुकाध्यक्ष मधुकर भोई मानसिक शेतकरी सेना तालुका अध्यक्ष विनोद पाटील शहराध्यक्ष मंगेश कोळी सामाजिक कार्यकर्ता गजानन वडसकर प्रहार दिव्यांग सेना उपजिल्हाध्यक्ष उत्तम जुमडे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.