Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


दिपनगरच्या विल्हाळे येथील राखेबाबत लोक संघर्ष मोर्चाचे २९ सप्टेंबर पासून आंदोलन

वेल्हाळे  येथील प्रकल्पग्रस्त मजुरांचे २९ सप्टेंबरपासून धरणे आंदोलन .

भुसावळ :
थर्मल पॉवर स्टेशन, दिपनगर येथील वेल्हाळ गावातील राख बंधाऱ्यावर काम करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या प्रकल्पग्रस्त मजुरांना रोजगार बंद झाल्याने अन्याय होत असल्याचा आरोप लोक संघर्ष मोर्चा, वेल्हाळे शाखेने केला आहे. या मजुरांना तातडीने न्याय मिळावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लोक संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष हेमंत पाटील व उपाध्यक्ष नितीन सुरवाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "महाजनकोकडून राख विक्रीचे आदेश काढल्यामुळे प्रकल्पग्रस्त मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. सन्माननिय न्यायालयाने यापूर्वी निकालात म्हटले आहे की ॲशपॉड येथून २०% राख स्थानिकांना उचल अधिकार कायम ठेवला आहे . राख उचल करतांना आधुनिक यंत्रसामुग्रीने न भरता स्थानिक मजुरांच्या हाताने उचल करावा जेणे करून त्यांना रोजगार मिळून उपजिविका भागवू शकतील मात्र तसे होतांना दिसत नाही . मजुरांना कोणतेही उपजिविकेचे साधन नाही .तरी प्रकल्पग्रस्तांना गेटपास व वस्तीचे हक्क कायम ठेवावेत. मागणी मान्य न झाल्यास २९ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता वेल्हाळ राख बंधाऱ्या प्रवेशद्वारावर शेकडो च्यासंख्येने प्रकल्पग्रस्त जनता अनिश्चित मुदतीचे धरणे आंदोलन सुरू करणार आहे."

या आंदोलनाची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या संदर्भातील प्रत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य अभियंता दिपनगर, स्थानिक पोलिस स्टेशन वरणगाव यांना पाठविण्यात आली आहे. असे लोकसंघर्ष मोर्चा यांचे कडून कळवण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.