Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


अट्रावल येथील सत्कार विद्या मंदीर विद्यालयात शिक्षक दिन कृतज्ञता दिन म्हणून साजरा

शिक्षक दिनानिमित्त कृतज्ञ सोहळा सत्कार विद्या मंदिर अट्रावल येथे शिक्षकांचा सत्कार

 सत्कार विद्या मंदिर अट्रावल या शाळेत शिक्षक दिन विशेष पद्धतीने साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेचे चेअरमन आदरणीय श्री. हेमंतकुमार एकनाथ चौधरी यांच्या ७५व्या वाढदिवसा निमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ व वस्त्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे पोलीस पाटील श्री. पवनकुमार हेमंत चौधरी यांनी उपस्थिती लावली. त्यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतात शिक्षकांचे कार्य समाजासाठी किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित करताना सांगितले की – “शिक्षक हेच खरी राष्ट्रनिर्मितीची बीजे पेरणारे असतात. प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांचा मोलाचा वाटा असतो. अशा गुरुजनांचा सत्कार करून आम्ही त्यांच्या ऋणाची थोडीफार परतफेड करतो आहोत.”

मुख्याध्यापक श्री. उमाकांत त्र्यंबक चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला. या नाविन्य पूर्ण सत्कार कार्यक्रम विद्यालयात स्टाफचा गौरव केल्या बाबत परिवाराचे धन्यवाद मानले . 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एन.सी. वाणी सर यांनी केले. यावेळी मान्यवर शिक्षकांमध्ये श्री. आर.एल. तडवी सर, श्री. दीपक बारी सर, श्री. ललित बढे सर, श्री. डी.जे. पाटील सर, श्री. एन.एस. पाटील सर, श्री. पी.व्ही. देशमुख सर, श्री. एस.आर. महाजन सर तसेच शिक्षिका सौ. सी.के. चौधरी मॅडम, सौ. अश्विनी पाटील मॅडम, सौ. अश्विनी काळबांडे मॅडम, सौ. शितल पुरी मॅडम यांचा सन्मान करण्यात आला.

शिक्षकेतर कर्मचारी श्री. एस.आर. कोळी सर, श्री. एस.आर. मेघे, श्री. सचिन झोपे सर यांनाही गौरवण्यात आले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शाळेत आनंदमय वातावरणात कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.