Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शेतकऱ्याने घाम गाळून पिकविलेल्या सेंद्रीय लिंबाला भाव नसल्याने शेतकऱ्यात नाराजी

शेतकऱ्याचा रक्ताने व घामाने पिकवलेला सेंद्रिय निंबुला भावाच नाही
  उन्हाळ्यात भाव खाणाऱ्या सेंद्रिय निंबुला कॅरेटला दोन तीनशे रुपये भाव मिळत असल्याने
  बळीराजाच्या आयुष्याचा आणि त्याच्या कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रश्न आहे. निर्माण झाला आहे ते फक्त उतारचढाव नाहीत, तर ते शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेले संकट आहे.   कवडीमोल भाव मिळत असल्याची खंत पाचोरा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व नगरदेवळा येथील सेंद्रिय शेतीचे  जनक विश्राम बागेचे मालक नाना महाजन यांनी व्यक्त केले.  वर्षीच्या आर्थिक नुकसानीमुळे महाराष्ट्रात १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे आकडे फक्त संख्या नाहीत, त्या प्रत्येक आकड्यामागे एक कुटुंब, एक स्वप्न आणि एक जीवन संपले आहे.

  
लिंबूला आजही किमान आधारभूत किंमत (MSP) नाही. शेतकऱ्यांना MSP दिल्यास किमान तोटा होणार नाहीं, म्हणजे त्या शेतकऱ्याचं कुटुंब वर्षभर कसं जगत असेल, याचा विचार करा. हे पैसे त्याचे कर्ज, मुलांचे शिक्षण आणि घरातील इतर खर्चांसाठी असतात. पण हा तोटा त्याच्या सगळ्या स्वप्नांचा नाश करतो 
हवामानातील बदलांमुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी सर्व लहान शेतकऱ्यांसाठी १००% कव्हरेज असलेला पीक विमा दिला पाहिजे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.