Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


अंतराळ संशोधक विक्रम साराभाई यांची जयंती संपन्न

अंतराळ संशोधक डॉ विक्रम साराभाई यांची जयंती साजरी

 भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक डॉ. विक्रम साराभाई : विद्यार्थ्यांना विज्ञान प्रेरणेचा संदेश दिला गेला .
डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे विज्ञान मंडळ प्रमुख एन. बी. चौधरी यांनी परिपाठातून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे जनक, प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या कार्याचा सखोल आणि इत्यंभूत परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.

चौधरी सरांनी त्यांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, संशोधनातील योगदान, उपग्रह प्रक्षेपणातील यशस्वी प्रयत्न आणि देशाच्या विज्ञानविकासासाठी केलेल्या दूरदृष्टीपूर्ण कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण करून संशोधनासाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महाशय मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विज्ञान मंडळाच्या या उपक्रमाचे अभिनंदन करत, विद्यार्थ्यांनी डॉ. साराभाई यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करावा, असे सांगितले. कार्यक्रमाला विज्ञान मंडळ सदस्य शिक्षक सर्व शिक्षक, बंधुभगिनी शिक्षकेतर बांधव आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.