Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव सुशीला राम कदम विदयालयात शिक्षक पालक संघाची सभा संपन्न

सुशीला राम कदम प्राथमिक विद्या मंदिर, वरणगाव येथे  दि.५/०८/२०२५ मंगळवार रोजी पालक शिक्षक सभा आनंदात संपन्न झाली.सभेचे अध्यक्ष स्थानी  किरण पाटील सर हे होते .
मुख्याध्यापिका श्रीमती संगीता चौधरी मॅडम यांनी प्रास्ताविकात विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विकास कसा साधता येईल याबाबत मार्गदर्शनपर संभाषण सादर केले,पालक -शिक्षक - विद्यार्थी अडीअडचणीवर चर्चेबाबत हितगुज मध्ये  पालकांनी मुलांना वेळ द्यावा व  मुलांच्या  शिक्षणासोबतच त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे सौ . रेखा चौधरी मॅडम यांनी सांगितले. नवीन शैक्षणिक वर्षापासून चे उपाध्यक्ष व सदस्य वर्ग निहाय निवड बिनविरोध झाली.उपाध्यक्ष पदी सौ भारती पाटील, पिंपळगाव खु यांची निवड करण्यात आली.
सुत्रसंचलन श्री विजय झोपे सर यांनी केले,, आभार प्रदर्शन सौ रेखा चौधरी मैडम यांनी केले,
सर्व शिक्षकांनी सहकार्य केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.