Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


निंभोरा येथे वीर गुर्जर सम्राट मिहीर भोज जयंती साजरी

वीर गुर्जर प्रतिहार सम्राट मिहीर भोज यांची जयंती निंभोरा बु॥ येथे उत्साहात साजरी .


निंभोरा बु॥ ता. भुसावळ येथे आज दि. 26 ऑगस्ट 2025 रोजी गुर्जर प्रतिहार सम्राट महान राजा मिहीर भोज यांची जयंती विठ्ठल मंदिर निंभोरा बु॥ येथे सकाळी 10 वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान समाजाचे जेष्ठ नागरिक सन्माननिय पितृतुल्य रामसिंग चौधरी यांनी स्वीकारले. प्रारंभी सम्राट मिहीर भोज यांच्या प्रतिमेचे पूजन सुकदेव चौधरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक पाटील यांनी केले तर रेखा पाटील यांनी सम्राट मिहीर भोज यांच्या कार्याविषयी सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. वीर पुरुषांनी केलेले शौर्य, बलिदान व निस्वार्थ समाजसेवा या गुणांचा समाजबांधवांनी विशेषत: युवक–युवतींनी आदर्श घ्यावा असे अनमोल विचार यावेळी प्रकट झाले.

समारोपाचे अध्यक्षस्थान घेत रमाकांत चौधरी, प्रदेश संघटन महामंत्री, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र यांनी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व मान्यवर म्हणून रामसिंग चौधरी, सुकदेव चौधरी, बाळकृष्ण पाटील, ईश्वर पाटील, बंडू पाटील, सुनिल चौधरी, श्रीराम पवार, विवेक पाटील, वैभव चौधरी, दिलीप चौधरी, प्रथमेश पाटील, चंद्रकांत पाटील, चेतन पाटील आदींसह महिला प्रतिनिधींमध्ये ज्योती पवार (प्रदेश उपाध्यक्ष, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभा महाराष्ट्र), अनुसया पाटील, सुमन चौधरी, जिजाबाई चौधरी, कोकीळा चौधरी, रेखा पाटील, वंदना पाटील, कल्पना पाटील यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कार्यक्रमास मोठ्या संख्येने पिंप्रीसेकम , निंभोरा ।बु । , दिपनगर वसाहत येथील समाज बांधवांनी उपस्थित राहून जयंती सोहळ्याला उत्सवी वातावरण प्राप्त करून दिले.

प्रेरणादायी समारोप विचार (रमाकांत चौधरी, प्रदेश संघटन महामंत्री)

“समाजाचे भविष्य घडवायचे असेल तर आपल्या पूर्वजांचा इतिहास जाणून घेणे व त्यांचे आदर्श आचरणात आणणे अत्यावश्यक आहे. सम्राट मिहीर भोज हे केवळ सामर्थ्यशाली राजा नव्हते तर त्यांनी समाजहितासाठी बलिदान, शौर्य व न्यायनिष्ठा यांचे सर्वोत्तम उदाहरण घालून दिले. आजच्या युवक–युवतींनी या पराक्रमी सम्राटाचे आदर्श आत्मसात करून शिक्षण, रोजगार, संघटन आणि समाजसेवा या क्षेत्रात नेतृत्व करावे. समाज एकजुटीने उभा राहिला तर कोणतीही अडचण मोठी राहत नाही. वीर गुर्जर प्रतिहारांचा हा वारसा आपल्यासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.”

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.