Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


हरतालिका या महीला समानता दिनी परिसर व गाव प्रदूषण मुक्तीचा संकल्प करू या - पर्यावरण प्रेमी डॉ सुरेंद्रसिंग पाटील यांचे आवाहन

*26 ऑगस्ट महिला समानता दिवस  तिथीप्रमाणे महिलांचा पवित्र सण हरतालिका महिलांनी आपला परिसर, गाव प्रदूषणमुक्तचा संकल्प करूया,       डॉ . सुरेंद्रसिंग पाटील *.               

  महिलांसाठी व कुमारीकांसाठी हरतालिका हे सर्वात कठीण  व्रत आहे .हे व्रत पार्वतीमाताने भगवान  शिवशंकरांना आपले पती व्हावे म्हणून भगवान शिवशंकर यांना प्रसन्न करण्याकरता  भाद्रपद शुक्ल तृतीयाला तपश्चर्येला बसल्या त्यादिवशी  भगवान शंकरांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन  पार्वती मातेला पत्नीच्या रूपात स्वीकारेल असे वचन दिले कुमारीका   आपणास चांगला वर मिळावा यासाठी हे कठीण व्रत करत असतात                           26 ऑगस्ट1971 ला पूर्ण समानता मिळण्यासाठी महिलांच्या प्रयत्नांना यश येत महिला समानता दिन अधिकृतपणे जाहीर झाला महिलांना त्यांचा हक्क व मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आज योगायोगाने तिथीप्रमाणे हरतालिका हे कठीण व्रत प्रत्येक महिला करत असते तसेच तारखेप्रमाणे 26 ऑगस्ट हा दिवस महिलांसाठी खास आहे 26 ऑगस्ट 1971 ला महिला समानता दिन म्हणून महिलांना सर्व हक्क तसेच मतदानाचा अधिकार पुरषाप्रमाने सर्वाधिकार प्राप्त झाले                              स्त्री  म्हणजे प्रत्येक क्षणाची साथ   स्त्री म्हणजे प्रत्येक अडथळ्यांवर मात अशा अनेकरुपी  आई बहिण वहिनी अशा सर्व स्त्री शक्तींना महिला समानता दिवस तसेच हरतालिका  निमित्ताने शुभेच्छा देत आपल्या येथील निसर्गनिर्मित साधन संपत्तीचे .कळत नकळत मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यावरणाच्या समतोलावर परिणाम झाल्याने पृथ्वीवरील आपल्या सहित सर्व सजीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान होणारे प्रदूषण कमी होण्यासाठी महिला वर्गाच्या सहकार्याशिवाय शक्य नाही तरी सर्व महिलांनी शालेय विद्यार्थिनींनी आपल्या कुटुंबासमवेत प्रत्येकाने आदरणीय प्रधानमंत्रीजी द्वारा एक पेड माँ के लिये अभियान2 मध्येही सहभाग होईल आपापल्या परिसरात सर्व सजीवांना लागणारे दीर्घकाळ टिकणारे संगोपना सहित झाडे लावून तसेच कोणीही लावलेला झाडाचे संगोपन करावे   सर्व सजीवांना लागणारी सर्व प्रकारचे दीर्घकाळ टिकणारी तसेच फळे फुले आयुर्वेदिक असे विविध प्रकारचे झाडे लावा पर्यावरणाचा समतोल कायम ठेवा सर्व प्रकारचे प्लास्टिकचा वापर टाळा व आपले गाव प्लास्टिक मुक्त करा  सार्वजनिक ठिकाणी होणारा कर्कश आवाजावर नियंत्रण ठेवा व  ध्वनी प्रदूषण टाळा खाजगी गाडीचा वापर जेथे अत्यंत आवश्यकता असेल तेथेच करावा शक्यतो सार्वजनिक वाहनांचा वापर करा व वायू प्रदूषण टाळा  पाण्याचा वापर योग्यरीत्या करून पाणी वाचवा व पृथ्वी वाचवा. तसेच उद्या असणाऱ्या गणेश चतुर्थी निमित्त सुखकर्ता दुख हर्ता विघ्नहर्ता श्री गणेशाची स्थापना करताना  पाच फळांचा नैवेद्य आपण ठेवत असतो ज्याच्या इथे जागा असेल किंवा शेती असेल त्यांनी पाच झाडे फळांची लावण्याचा संकल्प करावा. तसेच श्री गणेशास आपण 21 दूर्वा वाहतो तसेच 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो त्याप्रमाणे 21 विविध प्रकारची झाडांचा प्रसाद रुपी प्रसाद रुपी नैवेद्य दाखवून आपल्या भागामध्ये रस्त्यांच्या कडेला किंवा शेतीमध्ये लावावे. सर्व गणेश मंडळांनी सुद्धा याप्रमाणे करून संगोपनासहित झाडे आपापले यात लावल्यास खूप मोठा हातभार लागेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.