Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव फॅक्टरी वसाहत मध्ये बिबटयाचा कुत्र्यावर हल्ला . रहीवाश्या मध्ये दहशतीचे वातावरण

जखमी झालेले श्वान

वरणगाव फॅक्टरी वसाहतीतील  थरार 
 बुद्ध विहारासमोरील कुत्र्यावर हल्ला; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी वसाहतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात सुरु असलेल्या वर्षावास प्रवचन कार्यक्रमानंतर मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली. बुद्ध विहारासमोर बसलेल्या कुत्र्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला असून, ही घटना प्रत्यक्षदर्शी भंतेजींच्या डोळ्यासमोर घडली.या प्रकारामुळे संपूर्ण वसाहतीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

प्रवचन आटोपल्यानंतर भंतेजी बुद्ध विहारात एकटेच होते.दरम्यान,विहाराच्या गेटसमोर बसलेल्या कुत्र्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला.भंतेजींनी आरडाओरड केल्यावरही बिबट्या कुत्र्याला तसाच ओढत निघून गेला. घटनेची माहिती तात्काळ पी.जी.सोनवणे व संतोष वानखेडे यांना देण्यात आली.
या घटनेनंतर काही नागरिकांनी सांगितले की, वसाहतीच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चार ते पाच बिबटे वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले आहेत.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,लहान मुले,महिला व ज्येष्ठ नागरिक विशेषतः चिंतेत आहेत.नागरिकांनी फॅक्टरी प्रशासनाने व वनविभागाने तातडीने लक्ष घालावे, परिसरात गस्त वाढवावी,आवश्यक तेथे पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
संध्याकाळनंतर व रात्री एकटे बाहेर पडणे टाळा.लहान मुलांना एकट्याने खेळायला जाऊ देऊ नका.कचरा व उरलेले अन्न उघड्यावर न टाकता बंद डब्यात ठेवावे.घर,अंगण व सार्वजनिक ठिकाणी दिवे लावून ठेवा.
फुटपाथवर,जंगलाजवळ किंवा झुडपांमध्ये जाणे टाळा.शक्यतो मोठ्या संख्येने किंवा गटाने प्रवास करा.बिबट्या दिसल्यास आरडाओरड न करता शांतपणे सुरक्षित अंतर राखून त्वरित वनविभागाला कळवा.स्थानिक स्वयंसेवी संस्थांनी 'अलर्ट टीम' तयार करून नागरिकांना मदत करावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.