थोरगव्हाण, ता. रावेर – दी एज्युकेशन सोसायटी संचालित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात शालेय समिती सदस्य नंदकुमार चौधरी यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून विद्यार्थ्यांना देशभक्तीचा संदेश दिला.
ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी मधुर स्वरात देशभक्तिपर गीते सादर केली. विद्यार्थीनींनी स्वातंत्र्यदिनावर आधारित आकर्षक मॉडेल्स तयार करून प्रदर्शन ठेवले होते. यांना नंदकुमार चौधरी व मधुकर कोल्हे यांनी रोख बक्षिसे देऊन गौरवले. सामूहिक नृत्याच्या देखण्या सादरीकरणातून स्वातंत्र्याचा अभिमान व देशप्रेमाची भावना उंचावली. या स्पर्धा व कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक शिक्षक के. एम. पाटील, एस. बी. सपकाळे, एन. ए. देशमुख व टी. पी. घुले यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक नंदकुमार चौधरी, मधुकर कोल्हे, रविंद्र चौधरी उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत करून स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व विशद केले व शुभेच्छा दिल्या. सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार चौधरी यांनी सांगितले की अध्यक्षीय“स्वातंत्र्य हे आपल्याला सहज मिळालेले नाही, तर हजारो स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागातून मिळाले आहे. तिरंगा हे त्या त्यागाचे प्रतीक आहे. आजच्या पिढीने शिक्षणासोबत शिस्त, देशप्रेम व सामाजिक बांधिलकी जोपासणे अत्यावश्यक आहे. विद्यार्थ्यांनी केवळ यशस्वीच नाही तर जबाबदार नागरिक होणे, हीच खरी स्वातंत्र्यदिनाची प्रेरणा आहे .
कला शिक्षक एस बी सपकाळे यांनी दर्शनी फलकावर भारतीयांची अस्मीता "तिरंगा ध्वज" सुंदर चित्र कुंचल्यातून साकारले .
विद्यार्थीनी व शिक्षिका भगिनी सौ जयश्री प्रविण चौधरी यांचे नेतृत्वात मुख्य प्रवेशद्वार ' फ्लॅग पोल सभोवताली आकर्षक सुंदर रांगोळ्या काढल्या , स्काऊट गाईड पथक सर्व विद्यार्थी यांनी देशभक्ती ,पर्यावरण मूल्य तसेच मूल्याशिक्षणाचे मुलभूत दहा गाभा घटक यावर आधारीत घोषणा देत मुख्य रस्त्याने ग्रामपंचायत येथे ध्वज वंदन केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचालन क्रिडा शिक्षक जे ए चौधरी यांनी केले . देशभक्ती वातावरणाने शारदेचे प्रांगण फुलले होते . विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला . सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते