बेंडाळे हायस्कूल, विवरे येथे वक्तृत्व स्पर्धा संपन्न: २७ स्पर्धेकातून लहान गट प्रथम साक्षी पाटील मोठा गट प्रथम एकता पाटील विजयी .
श्री .ग गो बेंडाळे हायस्कुल येथे दि. १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक मा. पी. एच. वायकोळे यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. प्रारंभी उत्कृष्ट सूत्रसंचालन व प्रास्ताविक शिक्षिका निलीमा नेमाडे यांनी केले.
शाळेतील इयत्ता ५ वी ते ७ वी (लहान गट) यांच्यासाठी "लोकमान्य टिळकांचे बालपण व शिक्षण" तर इयत्ता ८ वी ते १० वी (मोठा गट) यांच्यासाठी "लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे समग्र जीवनचरित्र" हे विषय देण्यात आले. या स्पर्धेत एकूण २७ विद्यार्थ्यांनी आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीने सादरीकरण केले.
विजेते पुढीलप्रमाणे:
लहान गट –
प्रथम : साक्षी चंद्रकांत पाटील
द्वितीय : हर्षदा उमेश महाजन
उत्तेजनार्थ : पूर्वी दीपक मोहरकर
मोठा गट –
प्रथम : एकता संतोष पाटील
द्वितीय : भूमिका गणेश पाटील
तृतीय : हर्षाली प्रवीण खुर्दे
कार्यक्रमात ज्येष्ठ शिक्षक एस. व्ही. येवले यांनी लोकमान्य टिळकांचे प्रारंभिक जीवन, पत्रकारितेतील योगदान व विचारधारा यावर मार्गदर्शन केले. तर कलाशिक्षक अर्जुन सोळुंके यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, कलेतील योगदान, समाजकार्य, क्रांतिकारक भूमिका आणि आजच्या पिढीने घ्यावयाची शिकवण याविषयी प्रभावी विवेचन केले.
विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक वायकोळे सर, पर्यवेक्षक कोल्हे सर तसेच ज्येष्ठ शिक्षक एन. आर. तडवी, एस. एन. तडवी, येवले सर व सोळुंके सर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण विनिता राणे, पी. डी. बागुल आणि पूनम पाचपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन कुमुदिनी भंगाळे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. एन. राणे, टी. व्ही. पाचपांडे, विशाल मछळे, तेजल भिरूड, दीपाली चौधरी, पूनम राणे, देवेंद्र फेगडे, पी. पी. मिसर, देवेंद्र राणे, किरण सुरळकर यांनी विशेष सहकार्य केले.
वक्तृत्व स्पर्धे आयोजनातुन विद्यार्थ्यांच्या अंगी सभाधिरपणा समाजसेवा स्वातंत्य समता साहित्य निर्मिती श्रमप्रतिष्ठा मूल्य वृद्धिंगत होण्यासाठी शाळा सतत प्रयत्नशील आहे बाबत संस्था पदाधिकारी संचालक मंडळ यांनी उपक्रमाचे अभिनेदन कौतुक केले आहे .
कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.