देशमुख विद्यालय, थोरगव्हाण येथे वक्तृत्व स्पर्धा: प्रथम क्रमांक स्वप्नाली शिंदे , द्वितीय क्रमांक प्रणाली कोल्हे यांना प्राप्त .
थोरगव्हाण प्रतिनिधी –
डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू नारायण पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर उपस्थित होते. मान्यवरांच्या शुभहस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कला शिक्षक व समिती प्रमुख एस. बी. सपकाळे यांनी केले.
५ वीतील सर्व विद्यार्थ्यांना १११ शालेय गणवेश वाटप करण्यात आले. या उपक्रमात दाते संस्थेच्या भागधारक सौ. सरलाताई ज्ञानेश्वर पाटील (यावल) यांनी ४० गणवेश, श्री. सुरेश बाऊस्कर (पुणे) यांनी २५ गणवेश, सन १९९२ एसएससी बॅचचे श्री. दिनेश यशवंत राणे (पुणे) यांनी २५ गणवेश, तसेच कै. दगडू नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. बाळू नारायण पाटील (थोरगव्हाण) यांनी २१ गणवेश देण्यात आले. गणवेश वितरणाचे योजनाबद्ध नियोजन एन. ए. देशमुख यांनी केले.
वक्तृत्व स्पर्धेत एकूण १० विद्यार्थ्यांनी राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर केली. यात प्रथम क्रमांक कु. स्वप्नाली उमाकांत शिंदे (८ वी 'ब'), आणि द्वितीय क्रमांक कु. प्रणाली राजेंद्र कोल्हे यांनी मिळवला. कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू पाटील यांच्या शुभ हस्ते विजयी विद्यार्थिनींना प्रत्येकी १०१ रुपयाचे बक्षीची रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात जेष्ठ शिक्षक टी. पी. घुले यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. स्पर्धेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला. विजयी स्पर्धक विद्यार्थिनींचे अभिनंदन व मोफत गणवेश वाटपासाठी दानशूर दात्यांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले. प्रमुख पाहुणे उमाकांत बाऊस्कर यांनी दानशूर दाते यांनी विद्यालयात हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवुन १११ गरजु विद्यार्थ्यांची शालेय गणवेशाची गरज पूर्ण करण्यास दातृत्व दिले त्यांचे अभिनेदन केले आहे .
सूत्रसंचालन वाङ्मय समिती प्रमुख एस. बी. सपकाळे यांनी तर आभार प्रदर्शन वाय. जे. कुरकुरे यांनी केले. कार्यक्रमासाठी ए. ए. देशमुख, जयश्री चौधरी, एम. के. पाटील आणि वाय. जे. कुरकुरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.