विजयसिंग शांतीलाल परदेशी. वाडे. ता. भडगाव.
भडगाव तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी व लोहारा ता. पाचोरा येथील जिल्हा परीषद मराठी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजयसिंग शांतीलाल परदेशी वय ६१ वर्ष यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने दुखद निधन झाले. ते मागील महिन्यात लोहारा जि. प. शाळेतुन व सेवेतुन मुख्याध्यापक या पदावरुन सेवानिवृत्त झालेले होते.
या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना दि. २७ रोजी गुरुवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास वाडे येथे घडली. अंत्ययाञा आज दि. १८ रोजी शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता वाडे येथील राहत्या घरापासुन निघणार आहे. त्यांचे पश्चात आई, २ भाऊ, २ मुले, १ मुलगी, सुना व नातवंडे असा परीवार आहे. ते येथील संजय परदेशी व पदमसिंग परदेशी यांचे मोठे बंधु होतं.