दि एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण ( स्थापना 1917 ) ता रावेर संचालित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे ‘वनमहोत्सव सप्ताहा’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणप्रेम व वृक्षसंवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला.
या कार्यक्रमात हरितसेना प्रमुख युवराज कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना वनमहोत्सवाचे महत्त्व, वृक्ष लागवडीचे फायदे, पर्यावरण समतोलाचा मुद्दा आणि विद्यार्थ्यांची जबाबदारी या विषयांवर सविस्तर माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणे हीही जबाबदारी असल्याचे अधोरेखित केले.
या वेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रा. डी. के. पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या परिसरात अधिकाधिक वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले आणि वनमहोत्सव हा केवळ उत्सव नसून पर्यावरणाशी बांधिलकी व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या उपक्रमातून शालेय स्तरावर पर्यावरण संवर्धनाची सकारात्मक बीजे रुजली गेली असून, भविष्यातील जबाबदार पर्यावरण संवर्धक घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.
राष्ट्रीय हरीत सेना समिती यांनी पुढील वृक्षारोपन , वृक्षदिंडी , तुलसीपार्क , सीडबॉल , शाडूमाती गणेश मूर्ती बनवणे कार्यशाळा नियोजन केले आहे .
सर्वशिक्षक बंधुभगिनी शिक्षकेतर बांधव पालक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभत आहे .