मळगाव येथील घटना ५० हजारांचे नुकसान.
भडगावतालुक्यातील मळगाव येथील शेतातील वादातुन शेतात लावल्या कपाशीचे पिके उपटुन नुकसान केल्याची घटना घडलेली आहे. यात या शेतकर्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झालेले आहे. ही घटना दि. १७ रोजी गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडलेली आहे. याबाबत भडगाव पोलीस स्टेशनला एका महीले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे
याबाबत माहीती अशी कि, भडगाव तालुक्यातील मळगाव येथील शेतकरी माणिक रामदास पाटील यांनी आपल्या शेत गट क्रमांक ९२/२/ब या गटात कपाशी पिक लावलेले आहे. काही शेतकर्यांसोबत माणिक पाटील हे शेतात गेले असता तेथे कपाशीचे पिक कोणी तरी उपटुन फेकुन नुकसान केल्याचे यावेळी आढळुन आले. यावेळी शेजारील शेतकर्याने सांगीतले कि,सरोजनी परदेशी या महिलेने शेतातील कपाशीचे पिक दुपारी १२ वाजे सुमारास उपटत असल्याचे सांगीतले. दरम्यान सरोजनी परदेशी यांनी दि १२/७/२५ रोजी शेतकरी माणिक पाटील यांना माझ्या नवर्या कडून विकत घेतलेली शेत जमिन परत करून दे नाही तर मी तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून टाकेल. अशी धमकी दिली होती. तरी या प्रकरणी सरोजनी सुरेश परदेशी या महीला विरोधात भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या घटनेचा पुढील तपास हेड काॅन्सटेबल किशोर सोनवणे हे करीत आहेत.