Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


सकल लेवा समाज महिला मंडळातर्फे आखाड उत्सव उत्साहात संपन्न

भुसावळ येथे सकल लेवा समाज  महिला मंडळा तर्फे दि.13/07/2025 रविवार रोजी आखाड पार्टी (स्नेहसंमेलन आखाड उत्सव)कार्यक्रम प्रभाकर हॉल, मध्ये  अतिशय उत्साहात व जल्लोषात सादरा करण्यात आला. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सकल लेवा महिला मंडळाच्या अध्यक्षा, आदरणीय सौ. मंगलाताई पाटील तसेच उपाध्यक्षा प्रभाताई पाटील, सचिव राजश्री कोलते, खजिनदार स्वाती भोळे, व सकल लेवा महिला मंडळाच्या कार्यकारणी सदस्या डॉ. मृणाल पाटील, संध्या भोळे, वर्षा लोखंडे, मेघा कुरकुरे,कल्पना शिंदे, मनिषा पाटील, वैशाली चौधरी, वैशाली पाटील तसेच सहकार्यकारणी सदस्या, मोना भंगाळे, अनिता महाजन,मिनाक्षी धांडे, सोनल महाजन तसेच उत्सव समिती सदस्या जयश्री चौधरी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
सदर कार्यक्रमास 135 महिलांनी उपस्थिती नोंदविली. आखाड पार्टीच्या स्नेहसंमेलनामध्ये सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांनी आपली ओळख करून दिली. अध्यक्षा सौ. मंगलाताई पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले.त्यानंतर  विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या अंगी असलेल्या सुप्तकलागुणांना प्रतिसाद देण्यासाठी विविध मनोरंजनात्मक खेळ, उखाणा, नृत्य, गायन  आयोजित करण्यात आले. उखाणा स्पर्धेत प्रथम क्रमांकांचे बक्षिस सौ. हेमाक्षी बोंडे व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ. वर्षा पाटील यांना मिळाले तसेच बिस्कीट खाणे स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस सौ. जागृती चौधरी व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ. आश्विनी चौधरी यांना मिळाले. डोक्यावर ग्लास ठेवून डान्स करणे या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षिस सौ. आश्विनी चौधरी व द्वितीय क्रमांकाचे बक्षिस सौ.वैशाली शिंदे यांना मिळाले. सर्व विजयी स्पर्धकांना बक्षिस वाटप करण्यात आले.कार्यक्रमास सर्वच उपस्थित महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेवटी एक सरप्राईज गिफ्ट सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमास  डॉ. मृणालताई पाटील यांनी प्रभाकर हॉल उपलब्ध करून देवून विशेष सहकार्य केले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी भोजनाचा  आस्वाद घेतला. अश्या प्रकारे अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात आखाड उत्सव व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.