Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स वाटप

देशमुख विद्यालय थोरगव्हाण येथे कंपॉसबॉक्स वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न:शैलजा चौधरी ,कमलाकर चौधरी यांचे दातृत्व 

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी केवळ पुस्तकेच नव्हे, तर आवश्यक शैक्षणिक साहित्यही तितकेच महत्त्वाचे असते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी असे साहित्य वेळेवर उपलब्ध होणे, त्यांचा आत्मविश्वास आणि अभ्यासाची गती दोन्ही वाढवते. सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन जर दातृत्वातून विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होत असतील, तर ते एक प्रेरणादायी उदाहरण ठरते. अशाच हेतूने डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे एक उपयुक्त आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला कंपॉसबॉक्स वाटप सोहळा.
थोरगव्हाण विद्यालयात कंपॉसबॉक्स वाटप सोहळा उत्साहात पार पडला
थोरगव्हाण  येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येथे दिनांक १४ जुलै २०२५ रोजी इयत्ता ५ वीच्या सर्व प्रविष्ट विद्यार्थ्यांना मोफत Camlin कंपॉसबॉक्स वाटप करण्यात आले. प्रा. कमलाकर त्र्यंबक चौधरी व सौ. शैलजा कमलाकर चौधरी यांच्या दातृत्वातून व प्रेरणेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त प्राध्यापक तथा संस्था संचालक  कमलाकर त्र्यंबक चौधरी यांनी भूषविले. प्रमुख पाहुण्या म्हणून सेवानिवृत्त शिक्षिका सौ. शैलजा कमलाकर चौधरी उपस्थित होत्या.

मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष व पाहुण्यांचे स्वागत केले. निलेश देशमुख यांना वाढदिवसाच्या गुलाबपुष्य देवून शुभेच्छा दिल्या . मनोगत व्यक्त केले .कमलाकर चौधरी सौ .शैलजा चौधरी यांचा युवराज कुरकुरे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला.

एकूण ९० लाभार्थी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते Camlin कंपनीचे कंपॉसबॉक्स सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले.

प्रमुख पाहुण्या शैलजा चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “कंपॉसबॉक्ससारख्या शैक्षणिक साधनांचा उपयोग गणित, विज्ञान, व चित्रकलेच्या अभ्यासात विद्यार्थ्यांना नक्कीच होईल. विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत उपस्थित राहून अभ्यास पूर्ण करावा.”

अध्यक्षीय भाषणात प्रा. कमलाकर चौधरी म्हणाले, “संस्था विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी सदैव तत्पर असून, अशा उपक्रमांमधून विद्यार्थी प्रेरणा घेतात. कठीण परिश्रम करून शैक्षणिक क्षेत्रात उज्वल यश मिळवावे.”

कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले तर सौ. जयश्री प्रविण चौधरी यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला इयत्ता ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी, टी पी घुले , एम के पाटील, एन ए देशमुख सह सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.